माणसात देव शोधणारे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज
राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेणगाव तालुका अंजनगाव सुर्जी या गावात झाला. त्यांचे मूळ नाव डेंबुजी झिंगराजी जानोरकरअसे होते. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची खूप आवड होती. त्यांच्यावर आई-वडिलांचे संस्कारअतिशय चांगल्या प्रकारे झाले होते. समाजातील अंधश्रद्धा. भोळ्या समजुती ;जुन्या चालीरीती ; रुढी प्रथा परंपरा हे समुळपणे नष्ट करण्यासाठी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" म्हणत .आपल्या वऱ्हाडी भाषा शैलीत समाज प्रबोधन करणाऱ्या राष्ट्रसंत श्री गाडगे बाबांचे जयंती 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.. भुकेलेल्यांना अन्न दया.. तहानलेल्यांना पाणी दया.. व वस्त्रहिन व्यक्तींना वस्त्र दया.गरीब मुलांना शिक्षणात मदत करा. बेघर असलेल्यांना आसरा दया. अंध; विकलांग. बेघर व्यक्तींना आश्रय दया. आजारी व्यक्तींची मदत करा .बेरोजगारांना रोजगार दया. पशु-पक्षी ;मुक प्राण्यांना अभय दया. गरीब कमजोर मुला मुलींच्या लग्नात मदत करा. दुःखी आणि निराश लोकांना हिम्मत दया. हाच खरा धर्म आहे. आणि हीच खरी ईश्वर भक्ती आहे. संपूर्ण समाजाला अगदी अंतकरणापासून ओरडून सांगत असे. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. पायात तुटकी चप्पल डोक्यावर फुटके गाडगे. अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोशाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज. गाडगे महाराज हे जरी गोपालाचे भजन करीत असले तरी ते माणसात देव शोधणारे होते.
राष्ट्रसंत गाडगेबाबा आपले भजनात नेहमीच सांगत; की देवळात जाऊ नका.अंधश्रद्धेला बळी पडू नका. अडाणी राहू नका. सावकाराकडून कर्ज काढू नका. पोथी पुराण; मंत्र तंत्र;जादूटोणा; चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. माणसात देव शोधणारे असे गाडगेबाबा होते. हीच त्यांची शेवट पर्यंत शिकवण होती. माणसातच देव आहे याचाच शेवटपर्यंत गाडगेबाबा शोध घेत होते. गाडगेबाबांनी दिन दलितांच्या आणि पीडितांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजप्रबोधनाकरिता त्यांनी कीर्तनाचा प्रभावी असा वापर केलेला आहे. त्यांच्या कीर्तनात सामाजिक रूढी आणि परंपरा याविरुद्ध सतत टीका असायची. संपूर्ण समाजाला त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अशा प्रकारचा महान संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून संपूर्ण समाजाला दिला आहे.
अज्ञान ;अंधश्रद्धा ;अस्वच्छता यांचे समूळपणे उच्चाटन करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. समाजातील गरिबी आणि अंधश्रद्धा दूर करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे मर्म गाडगेबाबांनी सुरवांतीपासूनच ओळखले होते. त्यामुळेच गाडगेबाबां लोकांना सांगत असे की घरातील वस्तू विका. परंतु आपल्या मुलांना खूप शिक्षण दया.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. गाडगेबाबा कोणत्याही गावात गेल्याबरोबर सुरुवातीला स्वच्छता करायला सुरुवात करत असे. संपूर्ण गावातील गटारी आणि रस्ते साफ करत असे. त्यांचे स्वच्छतेचे काम संपल्यानंतर ते गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत असे. गाडगे महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोशाळा. धर्मशाळा. शाळा रुग्णालय आणि वस्तीग्रहे बांधली. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी भिक्षा मागून ही सर्व कामे केली आहेत. परंतु गाडगेबाबा हे संपूर्ण आयुष्यभर एखाद्या धर्मशाळेच्या ओट्यावर किंवा एखाद्या झाडाखाली आपला पसारा मांडून बसत असे . समाजातील अंधश्रद्धा .भोळ्या समजुती. रूढी .चालीरीती .प्रथा. परंपरा हे संपूर्ण नष्ट झाले पाहिजे. अशा प्रकारचा ध्यास अहोरात्र गाडगेबाबांनी घेतला होता.
संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. दिवसभर गावाची स्वच्छता आणि रात्री समाजप्रबोधनाची काम करत असत. आपले हे समाज प्रबोधनाचे कार्य चालू असताना राष्ट्रसंत गाडगेबाबांनी आपल्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही. किंवा स्वार्थासाठी कोणत्याही प्रकारचा आड पडदा त्यांनी ठेवला नाही. मी कोणाचाही गुरु नाही व माझा कुणीही शिष्य नाही असे ते नेहमी सांगत असे.
एक नम्र निवेदन=राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्ताने मी माझ्या संपूर्ण देश बांधवांना नम्रपणे सुचित करू इच्छितो की: ज्याप्रमाणे राष्ट्रसंत गाडगेबाबा सारख्या या थोर पुरुषांनी समाजात समाजप्रबोधनाचे काम केले. त्यांचे विचार काही अंशी तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावेत. असे केले तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम तर आहेच परंतु त्यात अधिकाधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.
विशेषतः तरूण पिढीला मी नम्र पणे सूचित करू इच्छितो की.खुप शिका. मोठे व्हा.. आपल्या भारत देशाचे रक्षण करा.आई वडिलांची सेवा करा. त्यांना वृद्धाश्रमापासून दूर ठेवा. वाईट व जीवघेण्या वेसणापासून दुर रहा.घरीआपले आई वडील आपली देवासारखी वाट पाहत आहे. याचे भान ठेवा. जीवनात गर्व करू नका. गर्वाचे घर हे नेहमीच खाली असते. याचे भान ठेवा. कितीही कमविले तरी ते येथेच राहणार आहे. वाहने हळु हळू चालवा. वेगावर नियंत्रण ठेवा.
म्हणून म्हणतो की, संसार केला कोट्यान कोटी ; मात्र मेल्यावर संग येईना लंगोटी. अशी वेळ माझ्या या तरुण बंधुंवर येऊ नये. अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करून राष्ट्र संत गाडगेबाबा या थोर समासुधारकास त्रिवार अभिवादन करतो.
==गोपाला गोपाला=देवकी नंदन गोपाला.== .
प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर.
(एम. ए.बी एड)
साकुरी. ता. राहता. जिल्हा. अहिल्या नगर. मो.9604797316.
.

Comments
Post a Comment