माय मराठी

 



मराठी भाषाआहे;माझी फार गोड

जगामध्ये मराठी ;भाषेस नाही तोड 


चवी साऱ्या त्यात ;कडवी;तिखट गोड

मराठीभाषा कायमची ;राहती हृदयात


गाथा तुकोबाची; ओवी जनाईची

तिच्याचरणी माथा ;टेकू सारे जण.


हरिपाठ माऊलीचा; भारुड नाथांचे

आनंद भरलेला ;जीवनात काठोकाठ.


किर्तन ;भजन; देहभान विसरे

जगतात माझी ;मराठीच महान.


साहित्याचे आहेत; अनेक प्रकार

मराठी भाषा जणु !थेंब अमृताचे.


नटते शब्दांनी ;थटते अलंकारानि

ओघळती मोती; जणू ओठांतूनी.


आहे अभिमान;माझ्या मराठीला मान 

मराठी माय माझी; महाराष्ट्राची शान.


ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे

साकुरी ता.राहता जिल्हा अहिल्या नगर 

 मो.9604797316

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी