गोपनीय माहितीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रणजितसिंह खराडे व त्यांच्या टीमची धडक मोहीम
टायर ट्यूबमध्ये दडवलेली अवैध दारू व वाहन जप्त; गुन्हा अन्वेषण पथकाची धडाकेबाज कामगिरी
खालापुर /प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यात अवैध दारूची विभागाच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ट्यूबमध्ये चलाखीने दारू भरून चारचाकी वाहनातून वाहतूक केली जात असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रणजीतसिंह खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ पथक तयार करण्यात आले. पोलीस हवालदार खराडे यांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार खालापूर तालुक्यात मौजे कुंभीवली येथे एका संशयित वाहन अडवून झडती घेण्यात आली असता टायर ट्यूबमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.या कारवाईत ट्यूबमध्ये भरलेली २४,०००/-रुपये किमतीची २४० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच ९५,०००/-किमतीचे वाहन क्रमांक MH 06 AB.7517 टाटा कंपनीची इंडिका डीलक्स वाहन असे एकूण१,१९,०००/रुपये किमतीचा असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी दिनेश नारायण नरे (वय५२) राहणार वरने तालुका कर्जत जिल्हा रायगड यास ताब्यात घेऊन खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 60/2026 महाराष्ट्र दारूबंदी अधि नियम 1949 चे कलम (65) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढील अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत.या मोहिमेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील,सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार शरद फरांदे,रणजीत सिंह खराडे,पोलीस शिपाई प्रदीप खरात या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
संबंधित आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.खालापूर तालुक्यात अवैध दारू विरोधात पोलिसांनी दिलेला हा मोठा दणका असून बेकायदेशीर धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.कायद्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्यांना माफी नाही,हा ठाम संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Post a Comment