जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुक 2026

 


कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा दणदणीत विजय

नरेश जाधव / कर्जत: - कर्जत तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 च्या निवडणुकांमध्ये परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बहुसंख्य जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उबाठा गट व मित्रपक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.


जिल्हा परिषद निवडणूक निकालानुसार, कळंब जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांनी शिवसेनेच्या हरिश्चंद्र निरगुडांवर २३४ मतांनी विजय मिळवला. कशेळे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुरेश दोरे यांनी ३७१९ मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. नेरळ जिल्हा परिषद गटात उबाठा गटाच्या सुनिता रोहिदास मोरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर ८८३ मतांनी मात केली. कडाव गटातून उबाठा गटाचे मारुती घारे विजयी ठरले. माणगाव तर्फे वरेडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी केवळ १९ मतांच्या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा अंकुश ठोंबरे यांनी ५५४७ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला.


पंचायत समिती निवडणुकीतही परिवर्तन विकास आघाडीची सरशी दिसून आली. पोशिर पंचायत समितीत शेकापच्या रेश्मा जोशी विजयी ठरल्या. कळंब पंचायत समितीत उबाठा गटाच्या कमलाबाई शिंगवा, पाथरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता पादिर, कशेळे पंचायत समितीत अक्षय तिटकारे, नेरळ पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान चंचे, दामत पंचायत समितीत महेश खारीक, वाकसमध्ये नितिन धुळे, कडाव पंचायत समितीत उबाठा गटाच्या सुषमा पवाळी यांनी विजय मिळवला.


माणगाव तर्फे वरेडी पंचायत समितीत शिवसेनेचे महेश विरले, उक्रुळ पंचायत समितीत उबाठा गटाच्या नमिता श्रीखंडे, मोठे वेणगाव पंचायत समितीत उबाठा गटाच्या चित्रा ठाकरे, तर बीड बुद्रुक पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.


या निकालांमुळे कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले असून, आगामी काळात तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णायक भूमिका निभावण्याची संधी या आघाडीला मिळणार आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.


कर्जत तालुका परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करीत निवडणूक यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते तसेच पत्रकारांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी