एस टी बस चालक. सर्जेराव दत्तात्रय देठे यांचे सेवा पूर्ती सोहळ्याचे आयोजन

 


विना अपघात सलग 29 वर्ष सेवा 

अहिल्या नगर/प्रा ज्ञानेश्वर बनसोडे :-अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सर्जेराव दत्तात्रय देठे यांचा परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारातून सेवा पूर्ती सोहळा 28 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केला आहे. त्यांनी 29 वर्ष विना अपघात सेवा बजावली आहे.


श्री देठे यांना या सोहळ्यात विशेष गौरविण्यात येणार आहे. त्यांचे कुटुंब सुसंस्कृत व धार्मिक आचरण असलेले आहे. ते राहुरी कृषी विद्यापीठातील शासकीय कर्मचारी श्री प्रविण बाळासाहेब देठे यांचे चुलते व ज्येष्ठ पत्रकार प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांचे व्याही आहेत.


सदर कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन श्री सर्जेराव देठे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी