Posts

Showing posts from December, 2025

खोपोलीत ‘रुबी सी फूड रेस्टॉरंट’ व ‘मिस्टर इराणी चहा हॉटेल’ थाटात सुरू

Image
  * मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते उद्घाटन ; खवय्यांसाठी सर्व प्रकारच्या डिशेसची खास मेजवानी खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली साजगांव परिसरात सुरू झालेल्या रुबी सी फूड रेस्टॉरंट आणि मिस्टर इराणी चहा हॉटेल या नव्या खाद्य स्टेशनचे उद्घाटन सोमवार, 29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना मालक मोहम्मद पठाण आणि मोईन पठाण यांनी सांगितले की, या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या चवीदार डिशेस तसेच पारंपरिक व लोकप्रिय पदार्थांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्जेदार चव, स्वच्छता आणि उत्तम सेवा हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदिपक शेंडे , माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , नवनिर्वाचित नगरसेवक हरीश काळे , विनायक तेलवणे , अनिता श्याम पवार , माजी नगरसेवक कैलास गायकवाड , नासीर पटेल , मनिष यादव , संजय पाटील , सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज पटेल ,आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, बाबु पुजा...

मंगेश काळोखे हत्या प्रकरण : साईबाबा नगर ते खोपोली पोलिस स्टेशन भव्य कॅन्डल मोर्चा

Image
  * सर्व आरोपी अटक होईपर्यंत शांत बसणार नाही - आ. थोरवे * हजारो नागरिकांचा सहभाग ; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर खोपोली व परिसरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला असला, तरी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा ठाम इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. * सोमवारी सायंकाळी भव्य कॅन्डल मोर्चा :- मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता साईबाबा नगर ते खोपोली पोलिस स्टेशन दरम्यान भव्य कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिक, विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. हातात मेणबत्त्या, फलक व घोषणांसह नागरिकांनी शांततेत निषेध व्यक्त केला.

सर्व आरोपींना अटक न झाल्यास पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

Image
  * उद्या कॅण्डल मार्च ; मंगेश काळोखे हत्येतील सर्व दोषींना अटक व फाशीची शिक्षा द्यावी - आमदार महेंद्र थोरवे  खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अति तातडीची बैठक घेऊन आंदोलनाचा स्पष्ट इशारा दिला. बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, साईबाबानगर ते खोपोली पोलिस स्टेशनपर्यंत मंगेशची निर्घृण हत्या झाली, त्या घटनेच्या निषेधार्थ उद्या सायंकाळी पाच वाजता कॅण्डल मार्च काढण्यात येईल. खोपोली हे सांस्कृतिक शहर असून अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. ही लढाई कायदेशीर मार्गांने लढायची असून मंगेशच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संपूर्ण शहरातील नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. थोरवे यांनी आरोप केला की, आतापर्यंत अटक न झालेल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. मात्र राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकल...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली काळोखे कुटुंबीयांची भेट

Image
  मंगेश काळोखे हत्या प्रकरण : खोपोली प्रकरणाचे राज्यभर पडसाद * दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी खोपोली / मानसी कांबळे : - खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खोपोली येथे मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान कुटुंबीयांसह परिसरातील महिला व ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. * ही हत्या माणुसकीला काळिमा फासणारी - एकनाथ शिंदे :- यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंगेश काळोखे यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ही हत्या पूर्णतः नियोजनबद्ध असून यामागे कट रचण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारतर्फे स...

खोपोली हादरविणाऱ्या खूनाच्या घटनेनंतर पोलिसांची वेगवान कारवाई ; तपासासाठी आठ पथके कार्यरत

Image
  खोपोली / प्रतिनिधी :-  खोपोली शहरात काल सकाळी घडलेल्या धक्कादायक आणि भिषण घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. * नागोठणेतून दोन संशयित ताब्यात :-  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर या दोन संशयितांना नागोठणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू असून हत्येमागील कट, शस्त्र पुरवठा आणि इतर सहकाऱ्यांची भूमिका उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. * आठ पोलिस पथके तपासात :-  या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. खोपोली, नवी मुंबई, मुंबई, मुंबई विमानतळ परिसर तसेच रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ही पथ...

खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या...

Image
  शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांचा सकाळी निर्घृण खून ; शहर बंदची हाक खोपोली / मानसी कांबळे - जतीन मोरे :- खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. शांत, औद्योगिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत खूनासारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती, संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. * शाळेतून परतताना हल्ला :- प्राथमिक माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना विहारी परिसरात, जया बार समोर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून ते फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत मंगेश काळोखे यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उप...

परिवर्तना'च्या स्वप्नांना हाताने झाडून काढले !

Image
* खोपोली भगवामय, कुलदीपक शेंडे यांचा दणदणीत विजय * नगराध्यक्षपदी 1,118 मतांनी सरशी ; शिंदे गट 14 जागांसह आघाडीवर, राष्ट्रवादीला 7 जागांवर समाधान * शरद पवार गटाचे खाते उघडले, अपक्ष राहुल गायकवाड नगरसेवक झाले * सुनील पाटील, मसुरकर, पानसरे, सॅम्युअल, रियाज पठाण यांना पराभवाचा झटका  खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होताच शहरात राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, शिवसेना - भाजप - आरपीआय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचा 1,118 मतांनी पराभव करीत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खोपोलीत भगवामय वातावरण निर्माण झाले आहे. या लढतीत काँग्रेसचे तौफिक कर्जिकर, आम आदमी पार्टीचे डॉं. रियाज पठाण तसेच पत्रकार किशोर साळुंके यांनी मिळून 1,602 मते घेतली. याशिवाय ऋषिकेश कोंडुसकर (273) आणि पत्रकार अनिल वाघमारे (318) यांनाही लक्षणीय मते मिळाली. या मतविभाजनामुळे मुख्य लढतीतील मतांतील अंतर वाढल्याचे चित्र दिसून आले. * दिग्...

नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लांबणीवर ; इच्छुकांचा जीव टांगणीला

Image
  राज्यात झेडपी - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात * पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांचा समावेश, नगरदेवळा बाहेर नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी राजकीय धूम पाहायला मिळत होती. इच्छुक उमेदवारांची लांबलचक रांग, पक्षांतर्गत हालचाली आणि मोर्चेबांधणी सुरू असतानाच आता ही निवडणूक लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समितीचा समावेश नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली होती. शिवसेना (शिंदे गट) कडून नगरदेवळा जिल्हा परिषद गटासाठी रावसाहेब जिभू ऊर्फ मनोहर गिरधर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, बाळद पंचायत समिती गणासाठी शीतल सोमवंशी यांचे नाव देखील फायनल करण्यात आले आहे. तर नगरदेवळा पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अभिलाषा रोकडे यांनी ...

ग्रीन सिग्नल : निवडणूक आयोगाचा ‘लाडक्या बहिणीं’ना मोठा दिलासा

Image
  आचारसंहिता लागू असतानाही नोव्हेंबर - डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता ; केवायसीसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत मुंबई / मानसी कांबळे :- राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा सुरू असून, निवडणुका तीन टप्प्यांत पार पडत आहेत. दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे मतदान पार पडले असून, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या जागांसाठी मतदान शनिवार, 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय महापालिका निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आचारसंहितेमुळे निधी वितरण रखडेल, अशी भीती होती. मात्र आता याच संदर्भात लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित करण्यास कोणताही अडसर नसल्याचे स्पष्ट झाले ...

खोपोलीचा कौल कुणाला ?

Image
  शिवसेना-भाजप युती आघाडीवर की राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला? * सत्तासंघर्षाच्या रणांगणात खोपोली ; 70 तासांत राजकीय चित्र स्पष्ट होणार! खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीने केवळ शहरापुरतेच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान झाले आणि त्या दिवसापासून उमेदवार, नेते, कार्यकर्ते आणि सामान्य मतदार सर्वजण एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत...खोपोलीचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागणार ? नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 7 उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत ही शिवसेना-भाजप युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशीच रंगताना दिसत आहे. * शेंडे फॉर्म्युला विरुद्ध राष्ट्रवादीची गोंधळलेली रणनीती :- युतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचारयंत्रणा उभी केली. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शेंडे यांची उमेदवारी ‘फिक्स’ असल्याची खात्री कार्यकर्त्यांमध्ये होती आणि त्याच आत्मविश्वासातून बुथनिहाय व्यूहरचना, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकद दिसून आली. या...

शेडवी फाट्याजवळ वॅगनर कारचा भीषण अपघात

Image
  जुना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी घटना ; चार जण जखमी, जीवितहानी टळली खोपोली / खलील सुर्वे :- जुना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर शेडवी फाटा येथे मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास वॅगनार कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खोपोलीहून मुंबईच्या दिशेने जात असलेली वॅगनार कार (क्रमांक MH 46-BE 1435) भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट मोरी भागात कोसळली, त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने मदतीसाठी जाखोटीया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुशीला कृष्णा ठोंबरे, रिया फाटे, दत्ता चिंधु पाटील हे जखमी झाले असून एका जखमीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आह...

खोपोलीजवळ भीषण अपघात

Image
  मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाच्या कॉलमला ट्रकची जोरदार धडक ; चालकाचा जागीच मृत्यू खोपोली / खलील सुर्वे : - मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर बुधवार, 17 डिसेंबर रोजी पहाटे सुमारे 4.35 वाजता एक भीषण अपघात झाला. सी. फॉर. एक्स (C-for-X) ब्लॉकने भरलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट अमृतांजन पुलाच्या कॉलमला जोरदार धडकला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक MH 12 LT 9777 उतारावर येत असताना अचानक ब्रेक फेल झाले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ट्रक थेट अमृतांजन ब्रिजच्या कॉलमवर आदळला. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात धनंजय दत्तात्रेय घुंडरे (वय 36, रा. देवाची आळंदी) या ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ट्रकमध्ये अडकलेला व छिन्नविछिन्न झालेला मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठ...

नगरदेवळा गावात स्मार्ट मीटर बसविण्यावर वाद ?

Image
  जोरजबरदस्ती, दमदाटीचे आरोप ; ग्राहकांचे अधिकार व नियम काय ? * मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला छेद ? महावितरण व ठेकेदारांवर नागरिकांचा सवाल * मानवाधिकार व ग्राहक न्यायालयात दाद मागण्याची मागणी नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावात सध्या स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगात सुरू असून अनेक ठिकाणी मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, काही नागरिकांच्या स्पष्ट हरकती असतानाही स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचे आरोप पुढे आले आहेत. काही ठिकाणी तर “शासकीय कामात अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करू” असा इशारा महावितरणचे कर्मचारी व ठेकेदारांकडून दिला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे गावात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व जाहीरपणे “स्मार्ट मीटर बसविण्यात कोणतीही जोरजबरदस्ती किंवा दमदाटी केली जाणार नाही. घरमालक घरी नसल्यास मीटर बसविले जाणार नाहीत” असे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या आदेशांना डावलूनच ठेकेदार व महावितरण कर्मचारी दमदाटी करत आहेत का ? की मग मुख्यमंत्र्यांचेच आदेश वेगळे आहेत, असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. सूत्रांकडू...

खालापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Image
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना मुंबईतून अटक * मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील ट्रकमधील चोरी उघड * मुंबईतील डोंगरी परिसरातून मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात खालापूर / प्रतिनिधी :- मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर घडलेल्या चोरीच्या घटनेचा यशस्वी छडा लावत खालापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबईतील डोंगरी परिसरातून आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, या यशाबद्दल खालापूर पोलिसांचे जिल्हा स्तरावर कौतुक होत आहे. ही कारवाई रायगड पोलिस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल मेहुल (खालापूर) तसेच पोलिस निरीक्षक सचिन पवार (खालापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जगताप, खालापूर पोलिस व मुंबई पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. * नेमकी घटना काय होती ? :- 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील माडप बोगद्याजवळ फिर्यादी आपल्या मालवाहतूक ट्रक (क्रमांक MH 16 AY 6197) मधून प्रवास करीत असताना, माडप टनेल ते कुंभि...

ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप

Image
  महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार ; आरोग्य, सन्मान व सुरक्षिततेचा संदेश नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पुढाकाराने शाळेतील 80 ते 90 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मिलिंद सोनवणे सर, अनिल काटकर सर, संपत वानखेडे सर, राजपूत सर, परदेशी सर, मुख्याध्यापक गणेश खैरनार सर, योगेश पाटील, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पाळी स्वच्छतेबाबत उघडपणे चर्चा होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. * पाळी स्वच्छता व आरोग्याबाबत सखोल जनजागृती : - यावेळी विद्यार्थिनींना पाळी (Periods) क...

शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनि मंदिराकडे जाणारे रस्ते अस्वच्छतेच्या विळख्यात

Image
  नगरदेवळा गावातील पवित्र शनि महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर उघड्यावर शौच ; ग्रामस्थ व भाविकांमध्ये तीव्र संताप नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावातील शनि महाराज मंदिर हे गावासह परिसरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर शनिवारी, शनि अमावस्या तसेच विविध धार्मिक पर्वांच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक शनि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येतात. मात्र, इतक्या पवित्र आणि श्रद्धेच्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते आज अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून, ही बाब गावाच्या आणि मंदिराच्या पावित्र्यावर डाग आणणारी ठरत आहे. गावातील गणपती दरवाजापासून लक्ष्मण कुंभार यांच्या आव्या (मातीची भांडी तापविण्याची भट्टी) पर्यंतचा मार्ग, तसेच पुढे बुरूजापासून बंधाऱ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर उघड्यावर शौचामुळे अक्षरशः दुर्गंधीने भरलेला आहे. विशेषतः रोज रात्री आणि पहाटेच्या सुमारास या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर लोक शौचासाठी बसत असल्याने भाविकांना मंदिरात जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या टाकीकडून येणारा रस्ता आणि शिंदोळकडून येणारा मार्ग या दोन्ही रस्त्यांवरही उघड्यावर शौ...

पोलिस यंत्रणा व सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय सहकार्य

Image
  रायगड / प्रतिनिधी :- समाजातील दुर्लक्षित, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना आधार देणाऱ्या कार्यातून नागरी सामाजिक विकास संस्थेने माणुसकीचे दर्शन घडविणारे एक अत्यंत स्तुत्य सामाजिक कार्य आज यशस्वीरीत्या पार पाडले. खोपोली परिसरातून माणगाव तालुक्यातील विळेगाव भागात भटकत असलेल्या एका निराधार मानसिक रुग्णाला सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून त्याला योग्य निवाऱ्यात दाखल करण्यात आले.  ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम मनचक्षू फाउंडेशनच्या टीमसोबत संयुक्तपणे राबविण्यात आली असून, या कार्यासाठी पोलिस प्रशासनाचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. * पोलिस प्रशासनाचे तत्पर सहकार्य ठरले निर्णायक :- या रेस्क्यू मोहिमेसाठी मानगाव पोलिस ठाणे आणि खोपोली पोलिस स्टेशन यांनी तत्काळ प्रतिसाद देत आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले. विशेषतः खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिलेले मार्गदर्शन, समन्वय आणि सक्रिय सहभाग संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्यंत निर्णायक ठरले. तसेच मानगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद तांदळे आणि यशोधन गालींदे यांनी दाखविलेल्या तत्परतेब...

भिवपुरी - कारशेट मार्गावरील भरावकाम व उत्खननाबाबत संशयाचे ढग

Image
  सावरगाव येथील कामाची माहिती मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे RTI अर्ज दाखल कर्जत / प्रतिनिधी : - भिवपुरी - कारशेट मार्गांच्या कामासाठी सावरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या भरावकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या भरावकामासाठी वापरण्यात आलेल्या मुरूम, माती व खडीचे उत्खनन नेमके कुठून करण्यात आले, त्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या होत्या का ? तसेच प्रत्यक्षात किती प्रमाणात उत्खनन व भराव करण्यात आला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव (रा. फुलाची वाडी, किरवली, ता. कर्जत) यांनी तहसीलदार कार्यालय, कर्जत येथे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज दाखल करून सविस्तर माहितीची मागणी केली आहे. * शासकीय नोंदीप्रमाणे काम झाले का ? :- हे भरावकाम शासकीय नियम व नोंदींनुसार झाले आहे की नाही, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. सार्वजनिक निधी तसेच नैसर्गिक संसाधनांचा वापर होत असताना पारदर्शकता राखणे अत्यावश्यक असून, या कामाशी संबंधित सर्व माहित...

दाखल्यात गंभीर चुका ; शाळा प्रशासनावर आरोप

Image
  खोपोलीतील प्राथमिक शाळा क्र. 13 मध्ये चुकीची जन्मतारीख, चुकीचे जन्मस्थळ नोंद * चुका दुरुस्त न करता पालकांना कामाला लावले जाते - पालकांचा आरोप खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगरपालिकेने दिलेल्या मूळ जन्मदाखल्याऐवजी चुकीचे हॉस्पिटल सर्टिफिकेट लावून बालवाडीपासून पुढील शाळेपर्यंत विद्यार्थ्याच्या जन्मतारीख व जन्मस्थळात गंभीर चुका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चुकीमुळे वर्षानुवर्षे पालकांची दिशाभूल होत असून शालेय प्रशासनाकडून दुरुस्ती नाकारल्यामुळे पालकांमध्ये संताप वाढला आहे. * प्रकरण काय ? :- मुतस्कीम युनूस धतुरे (वय 37, राहणार हाळ खुर्द) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा खरा जन्मदिनांक 14/09/1989 व जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली असा आहे. परंतु बालवाडी सेविकेने मूळ जन्मदाखला न लावता ‘माहेर हॉस्पिटलचे दुसऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र’ जोडले, ज्यात आईचे चुकीचे नाव लतीफा मोहम्मद सईद धतुरे, चुकीची जन्मतारीख 11 / 08/ 1988, चुकीची जन्मवेळ 4.20 असे नमूद होते. हीच चुकीची माहिती पुढे युसुफ मेहर अली उर्दू प्राथमिक शाळा क्र. 13 मध्येही नोंदली गेली. विशेष म्हणजे शाळेने व...

अलिबाग जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन उत्साहात साजरा

Image
  कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्क व संरक्षणाबाबत जनजागृती रायगड / प्रतिनिधी :- मा. मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग आणि अलिबाग जिल्हा कारागृह (वर्ग 2) यांच्या संयुक्त समन्वयाने 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन अलिबाग जिल्हा कारागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण, मूलभूत अधिकार आणि त्यासंबंधीची जनजागृती करण्यात आली. * बंद्यांच्या हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन :- कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ ॲंड. मानसी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, दरवर्षी 10 डिसेंबर रोजी संपूर्ण जगात मानवाधिकार दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश बंद्यांचे मूलभूत अधिकार जपणे आणि त्याबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा आहे. यावेळी त्यांनी बंद्यांना समान प्रतिष्ठा, न्याय्य वागणूक तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कोठे व कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ...

कर्जत प्रशासकीय भवनासमोर ‘पेड पार्किंग’ ?

Image
  महिला कर्मचाऱ्याकडून अरेरावी व अपमानास्पद वागणुकीचा नागरिकांचा आरोप ; चौकशीची मागणी कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- कर्जत प्रशासकीय भवन परिसरात वाहन पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, मुख्य गेटवर नियुक्त करण्यात आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडून सर्वसामान्य नागरिकांशी अपमानास्पद, अरेरावीपूर्ण वर्तन करण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही नियुक्ती अधिकृत आहे की अनधिकृत ? पार्किंग शुल्क वसुली कोणत्या नियमाअंतर्गत केली जात आहे ? कर्जत प्रशासकीय भवनासमोर ‘पेड पार्किंग’ सुरू झाली आहे का ? असे सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहेत. * प्रशासनिय भवन कुणाची मालमत्ता ? :- प्रशासकीय भवनात दररोज तहसील, प्रांत, महसूल व अन्य शासकीय कामासाठी शेकडो नागरिक येत असतात. अनेकजण स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनांतून तर काही बस, रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करून कार्यालयात पोहोचतात. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत वाहन उभे करणाऱ्या नागरिकांकडून “पार्किंगचे पैसे द्या, नाहीतर वरिष्ठांना तक्रार करीन”, “मी यूपी-बिहार वरून आलेली ...

मधु कांबीकर : लोककलेपासून राष्ट्रीय गौरवापर्यंतचा संघर्ष, साधना आणि सर्वोच्च अभिनयाचा प्रवास

Image
  मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात, जे केवळ अभिनय करीत नाहीत तर जगलेले आयुष्यच पडद्यावर साकार करतात. मधु कांबीकर (मधु वामन जाधव) हे असेच एक बहुआयामी, संघर्षशील आणि अत्युच्च अभिनयशैलीचे नाव आहे. मधु कांबीकर ही नुसतीच उत्तम नर्तिका नाही, तर उत्तम अभिनेत्री आहे, असा गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या आत्मकथनात काढला, हेच त्यांच्या प्रतिभेची पोच दाखवणारे आहे. * बालपण आणि लोककलेची पायवाट :- 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांनी शिक्षणाची सुरुवात मालेगाव येथेच केली. पुढील शिक्षण कांबी या गावात झाले. अवघ्या 11 व्या वर्षी पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेतले, तर वयाच्या 13-14 व्या वर्षी गुरू पांडुरंग घोटीकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या सान्निध्यात लावणी नृत्याची साधना सुरू झाली. येथूनच त्यांच्या लोककलेच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. * रंगभूमीवरील पहिली ठळक ओळख :- चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना ‘पुत्रकामेष्टी’ (1980) या नाटकात स...

नेरळ गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

Image
  रायगड पोलिसांचे मोठे यश ; गावठी कट्टा, राऊंड व मोटारसायकल जप्त नेरळ / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2025 अंतर्गत दाखल प्रकरणात पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गुजरात व नाशिक परिसरातून शिताफीने अटक केली आहे. सदर गुन्हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी घडला असून, 25 नोव्हेंबर 2025 रोजी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 109, 126(2), 351(2), 3(5) तसेच भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत कलम 3 व 25 लावण्यात आले आहेत. * पूर्ववैमनस्यातून गोळीबार :- फिर्यादी सचिन अशोक भवर (वय 40, रा. धामोते - नेरळ) हे बदलापूर येथून कामावरून स्कुटीवर घरी जात असतांना, धामोते येथील पेशवाई रोडवर आरोपींनी संगनमताने सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) वरून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीला अडवून त्यांच्यावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तपासात हा प्रकार...

खोपोलीत दत्तजयंती उत्सव भक्तीभावात साजरा

Image
  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांची दत्तगुरूंच्या चरणी सदिच्छा व प्रार्थना खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात दत्त जयंतीनिमित्त गुरुवार, 4 डिसेंबर 2025 रोजी भक्तीमय आणि श्रद्धेचा माहोल अनुभवायला मिळाला. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या सामूहिक घोषणांनी शहरभर वातावरण पावन झाले होते. पहाटेपासूनच भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मंदिरांत गर्दी केली होती. या पावन पर्वानिमित्त महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी शहरातील विविध भागांत आयोजित दत्तजयंती उत्सवस्थळी भेट देत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. दर्शनावेळी दत्तगुरूंच्या चरणस्पर्शाने अंतःकरणात शांती, श्रद्धा आणि अध्यात्मिक समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी कुलदीपक शेंडे यांनी खोपोली शहरातील सर्व नागरिकांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना केली. शहराचा विकास, नागरिकांमधील ऐक्य आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, अशीही त्यांनी सदिच्छा व्यक्त केली. दत्तजयंतीच्या निमित्ताने शहरभर आरती, भजन, दत्तमालेचे पठण, धार्मिक प्रवचने आणि दीपप्...

खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : मतमोजणीपूर्व सुरक्षा तयारीचा आढावा

Image
  मुख्याधिकारी पंकज पाटील यांची स्ट्रॉंग रूमला भेट ; 24 तास CCTV, अग्निशमन व कडक सुरक्षा व्यवस्थेची खात्री खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणीपूर्व सुरक्षा व्यवस्था, पारदर्शकता व विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी नुकतीच मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात असल्याची त्यांनी खात्री करून घेतली. या भेटीदरम्यान पाटील यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख सुरू असल्याची तपासणी केली. संपूर्ण परिसरातील हालचालींवर थेट नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत व कार्यरत असल्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ सुरू होणाऱ्या पॉवर बॅकअप (बॅटरी) व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. कोणत्याही परिस्थित...

मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानातील GR वर राज्यभर संताप..

Image
  “आंधळं दळतोय… आणि कुत्रं पीठ खातोय!” ग्रामपंचायतींना आर्थिक गर्तेत ढकलणारा शासनाचा निर्णय? खालापुर/प्रतिनिधी :- राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान’ अंतर्गत घरपट्टी, पाणिपट्टी आणि दिवाबत्ती करांच्या थकबाकीवर 50% सूट देण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे, त्याने गावोगाव प्रचंड खळबळ उडाली आहे.                   राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील ज्या निवासी मालमत्ताधरकांनी मालमत्ता कर, पाणीपटटी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या (सन २०२५-२०२६ या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह, दिनांक १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या ५०% रक्कम मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंमलबाजवणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस ५०% सवलत राहील. (म्हणजेच सन २०२५-२०२६ च्या पूर्ण करांची रक्कम + दिनांक १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या करांची एकूण थकबाकी मिळून येणा-या रकमेचा ५०% रक्कम) . कागदावर हा निर्णय लोकाभिमुख वाटू शकतो, पण प्रत्यक्षात तो ग्रामपंचायतींच्या अर्थसंकल्पावर आणि गावांच्या विकासावर प्रचंड ताण आणण...

वनवे येथे श्रद्धेच्या उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव संपन्न

Image
  * सामुदायिक काकड आरती, भजन, कीर्तन, महाप्रसाद आणि पालखी सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील वनवे - निंबोडे तसेच खालापूर दहिवली तर्फे बोरेटी, बीड खुर्द आणि खोपोली परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या संपूर्ण परिसरात दिवसभर अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. * पहाटे काकड भजनाने उत्सवाची सुरुवात :- 4 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 ते 6 या वेळेत सामुदायिक काकड भजन आरती पार पडली. पहाटेपासूनच गावात भक्तिमय निनाद घुमत होता आणि अनेक भाविकांनी उपस्थित राहून या आरतीचा लाभ घेतला. * संगीत भजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद :- सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनी मंडळ, कुंभिवली व आषाढी वारी पंढरपूर ग्रुप यांच्या वतीने संगीत भजन कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. * महाप्रसादाने भाविकांची सेवा :- दुपारी 12 ते 1 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद खालापूरचे व्यापारी शामसुंदर ...

बोरिवली आणि खोपोली येथे साजरा होणार श्री दत्तजयंती उत्सव

Image
  खालापुर/प्रतिनिधी :- सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी स्थापन केलेल्या "ओम सद्गुरू प्रतिष्ठान" या परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी महाराज यांच्या बोरिवली आणि खोपोली येथील स्थानांवर यंदाचा श्रीदत्तजयंती उत्सव मार्गशीर्ष १५ शके १९४७ म्हणजेच गुरुवार ४ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. श्रीदत्तजयंती निमित्त दोन्ही स्थानांवर सकाळी महापूजा आणि रुद्राभिषेक करण्यात येईल. ओम सद्गुरु प्रतिष्ठान, मोगलवाडी, खोपोली येथे सकाळच्या सत्रात प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांची महापूजा, रुद्राभिषेक पवमान सूक्तपठण संपन्न होईल तसेच संध्याकाळच्या सत्रात सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर तथा आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या अमृतवाणीत होणाऱ्या श्रीदत्तजन्म अध्यायाचे वाचन व नंतर "नमो गुरवे वासुदेवाय" या नामजपाचा गजर याच्या श्रवणाचा लाभ घेता येईल. संध्याकाळी ७.२५ वाजता स्वामी महाराजांची आरती होईल.  या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आरती नंतर रात्री ८.१५ वा. होणाऱ्या स्वामी महाराजांचा पालखी सोहळा! या पालखी सो...

स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया जाहीर

Image
  डिसेंबरला स्ट्राँग रूम सील, 3 डिसेंबरला मतमोजणीसाठी उघडणार - पारदर्शकतेला प्राधान्य खोपोली / प्रतिनिधी :-  खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या मतदान प्रक्रियेला वेग येत असताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे स्ट्राँग रूम संदर्भातील महत्त्वाची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (EVM) सुरक्षितपणे साठवणे, त्यांची सीलबंद प्रक्रिया आणि मतमोजणीपूर्व उघडणी हे सर्व टप्पे पूर्ण पारदर्शकतेने आणि उमेदवार / प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत. * स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रियेचे वेळापत्रक :-  स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 (मंगळवार) रात्री साधारण 10 वाजता (मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर) सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली, स्ट्राँग रूम उघडणे...या प्रक्रियेस सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. EVM स्ट्राँग रूममध्ये ठेवताना सील कशा प्रकारे लावली जाते हे संबंधितांना प्रत्यक्ष पाहता येईल. मतमोजणीकरीता 3 डिसेंबर 2025 (बुधवार) सकाळी 9.30 वाजता सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, श...