Wednesday, April 30, 2025

पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्त सुभाषनगर परिसर संरक्षित करा !

 



* भूस्खलनापासून सुभाषनगरच्या बचावासाठी उपाययोजना करण्याची माजी नगरसेवक मंगेश दळवी यांची मागणी


खोपोली / मानसी कांबळे :- मे महिना सुरू झाला आहे. मान्सून एका महिन्यांवर येवून ठेपला आहे. पावसाळा जसजसा जवळ येतो, तसतसा सुभाषनगरांचा जीव टांगणीला लागतो. मागील अनेक वर्षापासून मृत्यूला सुभाष नगरकर हुलकावणी देत आहेत, पण यंदा काय होईल ? दरड कोसळेल का ? सुभाषनगरची इर्शाळवाडी, तळई, माळीण होईल का ? असे विविध प्रश्न मनात पिंगा घालत असतात. यंदाही अशीच भिती उद्भवत असून पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्त सुभाषनगर परिसरात संरक्षण उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. 


खोपोली नगर परिषदेचे माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक 1 चे नेते मंगेश दळवी यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांना या संदर्भात निवेदन दिले असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर वस्ती डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. सरासरी 3000 ते 3500 लोकवस्ती असलेल्या या परिसरात दर पावसाळ्यात भितीचे वातावरण असते. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील घटनेनंतर लोकांच्या मनात भिती अधिकच गडद झाली आहे. संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी होत आहे. यासाठी निधी देखील मंजूर झाल्याचे समजते. परंतु अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही आणि पावसाळा 1 महिन्यांवर येवून ठेपला आहे. अशा परिस्थितीत सुभाषनगर येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात याव्यात. डोंगराळ भागात मागे ज्या पध्दतीने खड्डा खोदण्यात आला होता, तसा खड्डा खोदण्यात यावा. जेणे करून डोंगरातून येणारे दगड व माती त्या खड्ड्यात पडेल व नागरीकांना धोका कमी पोहचेल. तसेच ज्या भागातील खडक ठिसूळ झाला आहे, त्या भागात संरक्षण जाळी मारण्यात यावी. जेणे करून डोंगरातून येणारे दगड त्यात अडकतील व नागरीकांच्या घरांना कमी धोका पोहचेल, यासोबतच पावसाळ्यात या डोंगराळ भागात बांबू लागवड करण्यात यावी. बांबू लागवड करण्यात आल्यास डोंगरावरील माती खचणार नाही तसेच परिसरात हिरवळ देखील राहिल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी महिंद्रा कंपनीच्या इमारतीचे नुतनीकरण करून त्या ठिकाणी स्थलांतर संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. या संदर्भातील पत्रव्यवहार तसेच परवानग्या या पावसाळ्यापूर्वी घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सुभाषनगर परिसरातील नाले, गटारी यातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा, जेणे करून डोंगरातून येणारे पाणी तुंबणार नाही व नागरीकांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आजूबाजूच्या झाडांची छाटणी देखील करण्यात यावी, तरी संबधित उपाययोजना नगर परिषद पातळीवर करण्याबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावेत, असे आवाहन माजी नगरसेवक मंगेश दळवी यांनी केले आहे.

कौशल्य आत्मसात करीत आयुष्याला ध्येयापर्यंत पोहचवा!

 



* कर्जत येथील लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात मान्यवरांचे विद्यार्थ्यांना आवाहन 


कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत येथील 'लाईट ऑफ लाईफ' ट्रस्टचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवार, 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता कर्जत शहरातील सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करीत आयुष्याला ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले. 


याप्रसंगी कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील एक्स्टेंशन एज्युकेशन सायंटिस्ट डॉं. रवींद्र मर्दाने, केजीकेसी महाविद्यालयाचे प्रो. डॉं. उपाध्ये, दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा स्वदेश न्यूजचे महाराष्ट्र हेड रिपोर्टर फिरोज पिंजारी, शारदा एज्युकेशन इन्स्टिट्यूट डायरेक्टर महेश साळवी, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्प डिव्हिजन हेड गौतम कनोजे, प्लेसमेंट को ऑर्डिनेटर तानाजी मिणमिणे, महिला अर्थसहाय्य संयोजक रजनी शाम पत्रे, इलेक्ट्रिशियन ट्रेनर सुनील जाधव आदी उपस्थित होते. 


सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना कर्जत येथील एक्स्टेंशन एज्युकेशन सायंटिस्ट डॉं. रवींद्र मर्दाने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. केजीकेसी महाविद्यालयाचे प्रो. डॉं. उपाध्ये यांनी कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. 


दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा स्वदेश न्यूजचे महाराष्ट्र हेड रिपोर्टर फिरोज पिंजारी यांनी कौशल्य शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्याला रोजीरोटीसाठी घडविणाऱ्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे उपकार मानून जास्तीत जास्त तरूणापर्यंत ट्रस्टची माहिती पोहचवावी. ट्रस्टच्या विविध कोर्सला विद्यार्थी कसे येतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शारदा एज्युकेशन इन्स्टिट्यूट डायरेक्टर महेश साळवी यांनी योग्य कोर्स निवडीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचा समारोप व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्प डिव्हिजन हेड गौतम कनोजे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. यावेळी प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर तानाजी मिणमिणे, इलेक्ट्रिशियन ट्रेनर सुनील जाधव व महिला अर्थसहाय्य संयोजक रजनी शाम पत्रे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.


कार्यक्रमात संस्थेचा उद्देश, प्रशिक्षणाचे महत्त्व आणि ट्रस्टचे कार्य प्रभावीपणे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून स्वतःमध्ये झालेला सकारात्मक बदल शेअर केला. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंटर को ऑर्डिनेटर सागर खंडागळे यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना किट (साहित्य) वितरण करण्यात आले. राजू ढोले यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

सततच्या विजेच्या समस्येने कर्जतकर हैराण!

 


* कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा

कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यात वाढत्या वीज खंडित समस्येमुळे नागरिकांचा संयमाचा बांध तुटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने 29 एप्रिल 2025 रोजी महावितरण कार्यालयात अचानक धडक देण्यात आली. या धडक कारवाईने महावितरण प्रशासनाची धांदल उडाली असून समितीने तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहर व परिसरात दिवसाढवळ्या व रात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शहरी भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे. याआधी ऑगस्ट 2024 मध्ये कर्जत शहर बचाव समितीने साखळी उपोषण करून महावितरणच्या कार्यप्रणालीचा निषेध केला होता. त्यावेळी महावितरणच्या उपअभियंत्यांनी लेखी आश्वासन देत कामे पूर्ण करण्याचे वचन दिले होते. मात्र, एप्रिल 2025 पासून पुन्हा विजेची समस्या वाढली असून, दिलेली आश्वासने हवेत विरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा संघर्ष उभा राहिला आहे. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली. शिष्टमंडळात ॲंड. कैलास मोरे, रंजन दातार, राजेश लाड, दीपक बेहरे, हरिश्चंद्र यादव, कृष्णा जाधव, विद्यानंद ओव्हाळ, स्विटी बार्शी, लोकेश यादव, सुनिल मोरे, मुकुंद भागवत यांचा समावेश होता. 


शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीच्या आश्वासनांनंतर काहीही बदल झालेला नाही. वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. नागरीकांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. कामांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, एक्सप्रेस फिडर संदर्भात नगर परिषद प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचा आरोपही समितीने केला आहे.


समितीने स्पष्टपणे सांगितले आहे की, साखळी उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन संपलेले नाही. जर महावितरणने मे महिन्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत, तर पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणवर असेल. ही धडक मोहीम केवळ सुरुवात आहे, असा इशारा समितीने दिला असून, नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.


काही दिवसांपूर्वी इन्कमर बंद झाला होता, त्यावेळी फॉल्ट सापडण्यात वेळ गेला. तांत्रिक बिघाड झाले होते. आता वीज पुरवठा पूर्ववत होत आहे. कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारा वंजारवाडी फिडर कधीच बंद नव्हता. नगरपालिकेच्या अखत्यारीत काहीतरी दोष असल्याने शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसावा. नगर परिषदेला एक्सप्रेस फिडरसाठी एस्टिमेट मान्य करून दिले आहे. एक्सप्रेस फिडरचे काम करून घेणे नगरपालिकेची जबाबदारी आहे. 

- चंद्रकांत केंद्रे

उपअभियंता महावितरण.

महिनाभरात प्रलंबित कामे करून घ्यावीत, जर प्रलंबित काम केले नाही आणि गेल्या वर्षी सारखा जर लाईटचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला तर, नागरिकांचा संयम आता संपलेला आहे. नागरिक कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सहन करणार नाहीत आणि याच्या पुढचे आंदोलन हे लोकशाही किंवा सनदशीर मार्गांने नसेल, लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि मग जो काय 'लॉ अँड ऑर्डर'चा प्रश्न तयार होईल त्याला पूर्णपणे जबाबदार महावितरण राहील. 

- ॲड. कैलास मोरे

कर्जत वीज ग्राहक संघर्ष समिती

Tuesday, April 29, 2025

रायगड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

 


अक्षय तृतीयेला विशेष दक्षता


रायगड / प्रतिनिधी :- राज्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये विशेषतः अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर बालविवाहांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जिल्ह्यात यंदा बालविवाह होऊ नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा बाळगावी तसेच दुर्गम भागात जनजागृती करावी अश्या सूचना अपर जिल्हादंडाधिकारी सुनील थोरवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या.


विविध यंत्रणांनी आतापर्यंत घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असावे लागते. अन्यथा संबंधितांवर एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. विवाह सोहळ्यात सहभागी पुरोहित, मंडप व्यावसायिक, वर-वधूंचे पालक तसेच ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांच्यावरही कारवाईची तरतूद आहे.


अक्षय तृतीया सण ३० एप्रिल २०२५ रोजी असल्याने त्यादिवशी विशेषतः धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, बीचवरील हॉटेल्स यावर लक्ष ठेवण्यात येईल. गावांमध्ये विवाह कार्यक्रम होत असल्यास सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक यांनी मुला-मुलींच्या वयाची शहानिशा करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.


ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. आदिवासी प्रकल्प विभागाला किशोरवयीन मुलामुलींची माहिती घेऊन स्थानिक यंत्रणांना पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.


रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, सुधागड पाली आणि कर्जत तालुक्यात विशेष लक्ष देण्यात येणार असून, गावांमध्ये बैठका घेऊन बालविवाह प्रतिबंधासाठी प्रभावी पावले उचलली जाणार आहेत.


बालविवाहासारख्या अघोरी प्रथेला आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे आणि रायगड जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 १०९८ टोल फ्री क्रमांक :- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी १०९८ या टोल फ्री क्रमांक माहिती द्यावी. या क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

खोपोलीत सहज स्वर्गरथ पुन्हा सेवेत दाखल !

 


* खोपोली नगरपालिका हद्दीतील निधन झालेल्या व्यक्तींच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी निःशुल्क सहज सेवा

खोपोली / प्रतिनिधी :- सहज सेवा फाउंडेशन समाजाप्रती सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत असते. डॉं. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे ऍडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दोन वेळचे नि:शुल्क जेवण, मृत झालेले नातेवाईक दुरून येणार असतील तर नि:शुल्क शवपेटी व्यवस्था, अल्प काळासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे, दरवर्षी पार पडणारा सामुदायिक विवाह सोहळा, शाळा व कॉंलेजमध्ये लैंगिक शिक्षण व सायबर मार्गदर्शन, वैद्यकीय शिबीरे तसेच आदिवासी पाड्यावर जनजागृती यासारखे उपक्रम सातत्याने राबवित असतात. 8 मार्च 2025 पासून खोपोली शहरातील दवाखान्यात कन्येस जन्म देणाऱ्या मातांचा व कन्येचा सन्मान हा उपक्रम समाजाचे आगळे-वेगळे प्रतिनिधित्व करणारा ठरत आहे. संस्थेने विविध उपक्रमातून जागतिक उपक्रम देखील प्रस्थापित केलेले आहेत.


खोपोली शहरातील निधन झाल्यावर होणारी त्रासिक बाब पाहता सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे यांनी आपले वडील स्व. तुळशीदास शंकर जांभळे यांच्या स्मरणार्थ 17 सप्टेंबर 2020 रोजी खोपोली शहरात सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगाने नि:शुल्क तत्वावर स्वर्गरथ सेवा सुरु केली. आजपर्यत 1300 पेक्षा जास्त वेळा ही निःशुल्क सेवा पुरविण्यात आली आहे.


खोपोली शहरात 5 वर्ष सातत्याने ही सेवा सुरु आहे. स्वर्गरथ दुरुस्तीच्या कामासाठी असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यासंबंधी सहज सेवा फाउंडेशनने दिलगिरी व्यक्त करून लवकरात लवकर स्वर्गरथ दुरुस्तीचे काम करून घेऊन 1 मे 2025 रोजी नव्याने खोपोलीकरांना सुपूर्द करण्याचा मानस असताना 28 एप्रिल 2025 रोजी खोपोली युवा नेते राहुल जाधव यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ही सेवा कोणताही सोपस्कार न करता 28 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आली.

ही सेवा अखंडपणे सुरु राहण्यासाठी नागरिकांनी काही नियम पाळून सहकार्य करावे, अशी विनंती करताना प्रत्येक धर्माच्या रितीप्रमाणे धार्मिक गीताची सोय या स्वर्गरथमध्ये आहे. गरीब ते श्रीमंत सर्वांना सन्मानपूर्वक सेवा चोविस तास दिली जाते. कळत नकळत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी मानले आहेत.



Monday, April 28, 2025

39 वर्षीय युवक बेपत्ता

 


ठाणे / प्रतिनिधी :- विशाल रमेश म्हात्रे हा (वय 39 वर्ष) 306, गावदेवी अपार्टमेंट साई, आध्याय प्लाझासमोर कसेली गाव, ता. भिवंडी, जि. ठाणे मुलुंड (पश्चिम) येथे राहत असून सेल्स अप फायनान्स निर्मल गॅलेक्सी मुलुंड येथे कार्यरत आहे. 26 एप्रिल 2025 रोजी विशाल म्हात्रे हा ऑफिस संपवून व्यक्तिगत कामासाठी खोपोली येथे जात होता. तसे त्याने कळविले होते. परंतु मोबाईल स्विच ऑफ होईल असे बोलुन फोन कट केला. परंतु आजपर्यंत नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याकडे चौकशी केली असता कोणतीही माहिती नसल्याने विशाल रमेश म्हात्रे यांचे वडील रमेश कमलाकर म्हात्रे यांनी मुलुंड पोलिस स्टेशन येथे हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

 

विशाल रमेश म्हात्रे (वय 39वर्षे), रंग गोरा, उंची 5 फुट 6 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स व हातात टायटन कंपनीचे घड्याळ आहे. असे वर्णन मिळाल्यास त्वरित मुलुंड पोलिस स्टेशन येथे माहिती द्यावी, असे आवाहन विशाल म्हात्रे यांचे वडील रमेश म्हात्रे तसेच कुटुंबातील सदस्यांकडून करण्यात येत आहे.

कर्जत आमराई येथील शौचालयाची अवस्था बिकट

 



* अस्वच्छताच...अस्वच्छता 

* स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटले

* पाण्याच्या अभावाने दुर्गंधी

* नागरिकांचे आरोग्य धोक्यात 


कर्जत / नरेश जाधव :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ कर्जत...सुंदर कर्जतचा नारा देण्यात येत असला तरी लाखों रुपये खर्च करूनही कर्जतकरांना चांगल्या सुविधा व स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायक सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 


कर्जत नगर परिषद हद्दीतील वॉंर्ड क्रमांक 3 मधील आमराई परिसरात नागरीकांसाठी शौचालय बनविण्यात आले असून या शौचालयातील अतिशय दुरावस्था झाली आहे. गेलेल्या अनेक महिन्यांपासून सुविधांपासून वंचित असलेल्या या शौचालयाबाबत ठेकेदार, आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी सर्वच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. गुगल मॅपवर शौचालयांची माहिती देण्यात आल्याचा डंका पिटण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या शौचालयात सुविधा देणेच कर्जत नगर परिषद प्रशासन विसरले असल्याचे दिसून येत आहे. 


येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या शौचालयातील अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत, गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी पाणी नाही, पाईप फुटल्यानंतर कठडे तोडण्यात आले होते परंतु पाईप दुरूस्तीनंतर सदर कठडा बनविण्यात आला नाही. तो ज्या पध्दतीने तोडण्यात आला होता, तसाच आजही आहे. सदर शौचालय उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आहे, त्यामुळे यातील घाण या नदीपात्रात जात असल्याचे नागरीकांनी सांगितले. 


स्वच्छता कर्मचारी या शौचालयाकडे ढुंकून सुध्दा पाहत नाहीत. गेल्या अनेक महिन्यापासून या भागात झाडझुड अथवा स्वच्छता झालेली नाही. पाणी नसल्याने कधी-कधी दुर्गंधी देखील पसरते. या भागातील नागरीकांच्या आरोग्याबाबत कर्जत नगर परिषद प्रशासन उदासिन असल्याचे दिसून येत आहे. तरी या शौचालयाची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी, शौचालयात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, डागडुजी गरज असलेल्या ठिकाणी डागडुजी करून पडझड रोखावी...त्याच प्रमाणे आमराई परिसरातील या शौचालयाच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी स्थानिक नागरीक किवा युवकांवर देण्यात यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व अविनाश संजय जाधव यांनी केले आहे.

Sunday, April 27, 2025

श्रीमती शौल सखाराम जाधव यांचे दु:खद निधन

 


* भाजप खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांना मातृशोक 


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव यांच्या पत्नी तथा भारतीय जनता पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष राहुल सखाराम जाधव यांच्या मातोश्री श्रीमती शौल सखाराम जाधव यांचे सुभाषनगर येथे राहत्या घरी आज 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6:45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांची अंतयात्रा सायंकाळी 5 वाजता सुभाष नगर येथून निघेल व अंत्यविधी अमरधाम वासरंग खोपोली येथे होणार आहे.तरी जाधव परिवारासह सुभाषनगर ग्रामस्थ परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार - रवी गिते

 


* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी घेतली कोकण विभागीय माहिती उपसंचालक यांची भेट 


नवी मुंबई / प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी नुकताच कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. दरम्यान, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी नुकतीच नवनियुक्त कोकण विभागीय माहिती उपसंचालक रवी गिते यांची भेट घेत न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या वतीने त्यांचा शाल व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत कोकणात स्वागत व पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार केला. 


याप्रसंगी कोकण विभागीय माहिती उपसंचालक रवी गिते यांच्याशी संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. रायगडासह कोकणातील विविध समस्या, अडचणींची त्यांनी माहिती दिली. दरम्यान, कोकणासह राज्यातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयात साप्ताहीक, दैनिक, मासिक या वृत्तपत्रांची व त्यांच्या प्रतिनिधींची जशी नोंद केली जाते. तशीच नोंद त्या त्या जिल्ह्यातील वेब पोर्टल, ब्लॉग स्पॉट, युट्युब व तत्सम डिजीटल मिडीयाशी संबधित पत्रकार व त्यांच्या माध्यमांची देखील नोंद घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 


जिल्हा माहिती कार्यालयाला डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना सोयीसुविधा देता येत नसल्या तरी कमीत कमी त्यांची नोंद जिल्हा माहिती कार्यालयात झाल्यास कोणत्या जिल्ह्यात कोणते डिजीटल माध्यम आहे व त्याचा प्रतिनिधी कौन आहे? याचा तपशील तरी जिल्हा माहिती कार्यालय व राज्य शासनाकडे उपलब्ध राहील, अशी प्रतिक्रिया फिरोज पिंजारी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी देखील पत्रकारांच्या न्याय हक्काबाबत चर्चा केली. दरम्यान, यावर कोकण विभागीय माहिती गिते म्हणाले की, डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांच्या नोंदणीचा विषय हा वरीष्ठ स्तरावरील आहे. पण आपण तसे निवेदन दिल्यास आम्ही देखील वरिष्ठ स्तरावर हा विषय मांडू तसेच कोकणातील पत्रकारांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन नवनियुक्त कोकण विभागीय माहिती उपसंचालक रवी गिते यांनी दिले.

खोपोलीतील गरुड झेप अभ्यासिका दुर्लक्षित

 


* शिळफाटा येथे असणाऱ्या विद्यार्थी अभ्यासिका येथील विद्यार्थी वर्गांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


* खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समिती करणार पाठपुरावा

खोपोली / प्रतिनिधी :- रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतुन खोपोली शिळफाटा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी गरूड झेप अभ्यासिकेचा आरंभ करण्यात आला होता. खालापूरचे तत्कालीन तहसिलदार अय्युब तांबोळी यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सदर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत होती. आजपर्यंत साधारण 23 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत, हे या अभ्यासिकेचे यश आहे.

परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून विद्यार्थी असुविधेचा सामना करीत आहेत.अनेक वेळा अर्ज करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अभ्यासिकेत अभ्यास करणारे विद्यार्थी हे समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी आहेत. नोकरी करून पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे या अभ्यासिकेतील वाढीव वेळ मिळावा यासाठी आग्रही असुन पिण्याचे पाणी याची गैरसोय असून स्वछतागृहाची स्वछता विद्यार्थीच करीत असतात व सदर ठिकाणी वायफाय (Wi-Fi) ची व्यवस्था सुध्दा विद्यार्थी स्वत: पदरमोड करून करीत आहेत.


यातुन मार्ग निघत नसल्याने विद्यार्थी वर्गांने खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीकडे 27 एप्रिल 2025 रोजी याकडे लक्ष द्यावे, अशी लेखी विनंती केली आहे. त्यानंतर खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने डॉं. शेखर जांभळे व मोहन केदार यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी करून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थी वर्गांने यावर मार्ग काढल्यास अभ्यासात अधिक लक्ष देता येईल हे वास्तव सत्य मांडले आहे.


सदर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत असून शासनाने अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून द्याव्या यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रसंगी न्याय मिळविण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने डॉं. शेखर जांभळे व मोहन केदार यांनी सांगितले आहे.

Friday, April 25, 2025

14 मे रोजी कर्जतच्या 'त्या' हॉस्पीटल विरोधात आंदोलन

 


* परवानगी नसताना गुंगीचे इंजेक्शन देणाऱ्या डॉंक्टर व हॉस्पीटल विरोधात कार्रवाई करण्याची मागणी 

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत येथील एका डॉंक्टराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. पदवी अथवा परवानगी नसताना कर्जत तालुक्यातील एक विख्यात, प्रसिद्ध डॉंक्टर शस्रक्रियेदरम्यान स्वत:च भुली (गुंगी) चे इंजेक्शन देत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. याबाबत अनेक रूग्ण व सामान्य नागरीक, पत्रकार यांची देखील तक्रार आहे. अनेक जण चर्चा करीत होते, पण या प्रकरणातील सत्य काय ? संबंधित डॉंक्टरला भुलीचे इंजेक्शन देण्याची परवानगी आहे का ? हा व्हिडिओ कुणी व का बनविला ? या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी व सत्य बाहेर यावे, यासाठी दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी आरोग्य विभागाकडे जनहितासाठी दाद मागितली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे पण या प्रकरणी आरोग्य विभाग व शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सीबीआय (CBI) चौकशीच्या मागणीसाठी बुधवार, 14 मे 2025 रोजी एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार फिरोज पिंजारी यांनी दिला आहे.

आरोग्यमंत्री व संबधित अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्जत (जि. रायगड) येथील एका मोठ्या हॉस्पीटलमध्ये रूग्णांचा मोठ्या प्रमाणावर उपचार होत असतो. ऐवढेच नव्हे तर अनेक शस्रक्रिया देखील केल्या जात असतात. परंतु संबंधित शस्रक्रिया करताना भूलतज्ज्ञ यांच्यामार्फंत भुल (गुंगीचे) इंजेक्शन दिले जाते. भुल (गुंगी) साठी देण्यात येणारे 'ते' इंजेक्शन पदवी व परवानगी नसताना संबधित डॉंक्टर देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ऐवढेच नव्हे तर तसा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral) होत आहे. तर दुसरीकडे एका तक्रारदाराने तसे स्पष्ट म्हटले सुध्दा आहे. त्या रूग्ण व त्याच्या नातेवाईकाने चौकशीची मागणी केल्यावर तशी चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल देखील जिल्हा शल्य चिकीत्सक यांना देण्यात आला आहे. त्यात ही गुंगीचे इंजेक्शन संबधित डॉंक्टर स्वत: देत असल्याचे सांगण्यात आले आहे. रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईक यामध्ये देखील चर्चा आहे. अनेकांनी तोंडी तक्रार पत्रकार यांच्याकडे केली आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून 13 जानेवारी 2025 व 21 फेब्रुवारी 2025, तसेच त्यानंतर ही मी आपल्याकडे अर्ज केला आहे पण 'त्या' डॉंक्टर व हॉस्पिटलला वाचविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला आणि पत्रकार, पत्रकार संघटना पदाधिकारी व नागरीक, रूग्णांचे नातेवाईक, समाजसेवक यांना 14 मे 2025 रोजी कर्जत उपजिल्हा रूग्णालय परिसरात एकदिवसीय ठिय्या आंदोलन करावे लागत आहे, असे पत्रकार फिरोज पिंजारी यांनी म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले की, माझ्या निवेदनाची दखल घेत कर्जत बाह्य रुग्ण निवासी वैद्यकीय अधिकारी (वर्ग-1) डॉं. किरण शिंदे, उरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉं. बाबासो काळेल, पनवेल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी भुलतज्ज्ञ डॉं. प्रथमेश आसवले, अलिबाग उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसेविका उषा वावरे यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, ही चौकशी समिती फक्त चौकशीचे सोंग तर करीत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण चौकशी समितीचा अहवाल अद्याप मला मिळालेला नाही, ऐवढेच नव्हे तर मी जेव्हा माझे म्हणणे मांडत होतो तेव्हा चौकशी समितीचे सदस्य हे त्या डॉंक्टर व हॉस्पिटलची बाजू घेत होते. जर चौकशी समितीच गुन्हेगाराची बाजू घेत असेल तर हा प्रकरणात गौडबंगाल असण्याची मला दाट शक्यता आहे. ऐवढेच नव्हे तर संबधित डॉंक्टर व हॉंस्पिटल यांनी चौकशी समिती तर मॅनेज तर केली नाही ना असा संशय आहे. ऐवढेच नव्हे तर कर्जत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देवूनही त्याच्याकडून अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही, अहवाल आल्यावर चौकशी करू असे म्हणण्यात आले आहे, पण चौकशी समिती, कर्जत वैद्यकीय अधिक्षक, रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक आदींनी चौकशी समितीचा अहवाल अद्याप पोलिस प्रशासन व मला अर्थात तक्रारदाराला दिलेला नाही म्हणून माझा संशय अधिक गडद होत आहे, असे पत्रकार पिंजारी यांनी म्हटले आहे. 

मी माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीकडे लेखी निवेदन व संबंधित व्हिडीओ दिला आहे. दरम्यान, चौकशी समितीने संबंधित डॉंक्टराकडे 'त्या' व्हिडिओबाबत चौकशी केली असता संबंधित व्हिडीओ कोरोना काळातील असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. परंतु त्यांनी पुढे सांगितले की, यावेळी मी फक्त सुई (शिरीन) आत टाकली होती, जसे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु इंजेक्शन भूलतज्ज्ञ यांनी दिले. भूलतज्ज्ञ डॉंक्टर यांनी देखील उपस्थित असल्याचे एक पत्र चौकशी समितीला दिले आहे. 

दरम्यान, यावरून काही प्रश्न निर्माण झाले आहेत व चौकशी समितीने हे प्रश्न संबंधित डॉंक्टराला विचारावेत व सत्य बाहेर आणावे, नाही तर एक साध्या कागदाने 'त्या' डॉंक्टराला क्लिनचिट देवून रूग्णांच्या जिवाशी खेळ होवू नये, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी सदर प्रकरण सीबीआय (CBI) ला सोपविण्यात यावे, अशी मागणी पत्रकार फिरोज पिंजारी यांनी केली आहे.

काही प्रश्न उपस्थित केले होते तरी आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी. डॉंक्टर व भुलतज्ज्ञ तसेच हे रूग्णालय नोंदणीकृत करण्यासाठी ज्या एमडी, एमबीबीएस डॉंक्टरने पत्र दिले आहे. शस्रक्रिया अथवा मोठ्या उपचारादरम्यान उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे, त्यांची व रूग्णालयातील सर्व डॉंक्टर, नर्स यांच्याकडे सर्व पदव्या व परवानग्या असतील तर त्या आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात याव्यात अन्यथा रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉंक्टर व त्यांना वाचविणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात एल्गार पुकारत जनआंदोलन छेडण्यात येईल आणि तरी ही कार्रवाई करण्यात आली नाही, चौकशी करण्यात आली नाही...दोषी आढळल्यास त्यांचे रजिस्ट्रेशन व प्रॅक्टिसची परवानगी रद्द करण्यात आली नाही तर आम्ही बुधवार, 14 मे 2025 रोजी मी व माझी टीम एकदिवसीय ठिय्या आंदोलन कर्जत उपजिल्हा रूग्णालय परिसरात करेन व या आंदोलनातून जनप्रशोभ निर्माण झाल्यास...जनता आक्रमक झाल्यास, संघर्ष निर्माण झाल्यास किंवा आमच्या जीवास अथवा संबंधितांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक, कर्जत प्रातांधिकारी, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत तहसिलदार यांची राहिल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

पत्रकार फिरोज पिंजारी यांनी सांगितले की, सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, मी एका चुकीच्या गोष्टीचा विरोध करीत आहे. मी डॉंक्टरांना लोकांच्या जीवाशी खेळण्यापासून रोखत आहे. लाखो-कोट्यवधीचा हा खेळ आहे. रूग्णालय व डॉंक्टरवर कार्रवाई झाल्यास पैशांचा ओघ थांबेल, हा थांबू नये, रूग्णालयावर कार्रवाई होवू नये...यासाठी उद्या माझा जीव ही घेतला जावू शकतो. मला जीवे मारण्यास डॉंक्टर व त्यांना सहकार्य करणारे नेते, लोकप्रतिनिधी, गावगुंड मागे-पुढे पाहणार नाहीत. तसेच पोलिस माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करून मला अडकवू शकतात. तरी जर मला काही झाले, माझा जीव गेला...माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला...मला धमकी आली, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तर याची संपूर्ण जबाबदारी संबधित डॉंक्टर, भुलतज्ज्ञ व हॉस्पिटलशी संबंधित सर्व डॉंक्टर, नर्स, कर्जत उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक, रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक व रायगड जिल्हा अधिकारी यांची राहील. 

आज हे प्रकरण समोर आणल्याने माझा जीव धोक्यात आहे...माझ्याविषयी खोटेनाटे आरोप ही केले जात आहेत. तसेच खोटा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी व्हाया व्हाया येत आहे. माझा जीव गेला तरी मी सत्यासाठी लढत राहीन, पण हजारों लोकांचा जीव वाचण्यासाठी आपण जातीने लक्ष द्यावे व योग्य ती कार्रवाई करावी, अशी मागणी पत्रकार फिरोज पिंजारी यांनी आरोग्यमंत्री व राज्य सरकार, आरोग्य विभाग यांच्याकडे केली आहे.

Thursday, April 24, 2025

सुभाषनगरकरांसाठी धावून आले नगरसेवक दळवी

 



* पावसाळ्यापूर्वी नाले, गटारींची करून घेतली सफाई

* दरडग्रस्त सुभाषनगरसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार 

खोपोली / मानसी कांबळे :- प्रभाग क्रमांक 1 मधील सुभाषनगर परिसर दरडग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे. दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मागील 5-6 वर्षापासून स्वर्गीय जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांच्यासह माजी नगरसेवक मंगेश दळवी, पत्रकार खलील सुर्वे, फिरोज पिंजारी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. हनुमंतराव ओव्हाळ यांच्या मृत्यूनंतर सुभाषनगर परिसराची संपूर्ण जबाबदारी माजी नगरसेवक मंगेश दळवी यांनी घेतली असून दरडग्रस्त सुभाषनगर येथील नागरीकांच्या सुरक्षितेसाठी ते सतत पाठपुरावा करीत आहेत. आताही पावसाळ्यापूर्वी सुभाषनगर परिसरातील नाले, गटारी तसेच डोंगर परिसराची व्यवस्था ते पाहत असून नागरीकांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार देखील केला आहे. 

पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने माजी नगरसेवक मंगेश दळवी यांनी सुभाषनगर परिसरातील नाले व गटारींची जेसीबीच्या माध्यमातून साफसफाई करून घेतली. नाल्यांमधील कचरा, गाळ, मातीचे ढीग यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून दुर्गंधीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन नागरीक आजारांना बळी पडू नये. तसेच पावसाळ्यात निचरा जलद गतीने होण्यास मदत व्हावी, यासाठी नाले सफाई करण्यात आली. 

     


  या प्रमुख गोष्टी लक्षात घेत आणि पर्यावरण आणि स्वच्छता हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवत नगरसेवक मंगेश दळवी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद शिंदे, संपत गाढवे यांच्यामार्फत सुभाषनगर येथे करण्यात आलेल्या नालेसफाई आणि गटार स्वच्छतेमुळे सुभाषनगर ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

Wednesday, April 23, 2025

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती

  



* कोकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार

नवी मुंबई / प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्विकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्विकारला.

याप्रसंगी ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, सहायक संचालक संजीविनी जाधव पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पत्रकार मच्छिंद्र पाटील, कोकण विभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाच्या 22 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत असलेले रवी गीते यांचाही समावेश आहे.

गिते यांचा पत्रकारितेपासून शासकीय सेवेपर्यंतचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय ठरला आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी लोकपत्र, नवराष्ट्र आणि सामना या प्रमुख दैनिकांत पत्रकार म्हणून कार्य केलेले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांनी माहिती विभागातील सेवेमध्ये प्रभावीपणे उपयोग केला आहे.

शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात सहायक संचालक म्हणून सुरुवात केली. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्य केले. सध्या ते वर्धा जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होते.

त्यांच्या पदोन्नतीनंतर आता त्यांनी कोकण विभागीय माहिती उपसंचालक या नव्या आणि जबाबदारीच्या पदावर रुजू होत कोकण विभागातील शासकीय माहिती व्यवस्थापनाला अधिक सक्षम दिशा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि अनुभवाचा फायदा कोकण विभागाला निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रमाधाम वृद्धाश्रमात रंगली विरंगुळा धमाल मैफिल




* सहज सेवा फाउंडेशनच्या उपक्रमात आनंदात न्हावून गेले आजी आजोबा

खोपोली / प्रतिनिधी :- सहज सेवा फाउंडेशन सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवित असते. सामाजिक बांधिलकीतुन खोपोली जवळील आडोशी रमाधाम वृद्धाश्रमात 22 एप्रिल 2025 रोजी पार पडलेल्या उपक्रमात एमजीएम कॉलेज, कळंबोलीची विद्यार्थिनी संचिता पाटील यांनी बदलत्या वयोमानात मेंदू कसा कार्यरत ठेवावा, प्रसिद्ध विनोदवीर विजू थॉमस यांनी वेगवेगळ्या आवाजातील बहारदार मिमिक्री, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना भावणारे मोईन शेख यांची मनाला भिडणारी शेरोशायरी तर खोपोलीतील प्रसिध्द व्यावसायिक व कलाकार किशोर महाजन यांनी धम्माल गाणी गात तर मंगेश सुखधरे यांनी मराठी भावगीते गावून वातावरण मंत्रमुग्ध केले.

याचसोबत कल्याणी साखरे व उषा रोठे यांनी सादर केलेल्या विरंगुळ्यात वृद्धाश्रमातील आजी आजोबां नी मनमुराद प्रतिसाद दिला. विद्या तेलवणे यांनी खाऊचे वाटप केले. रमाधामचे व्यवस्थापक विनोद सैद पाटील तसेच स्टाफ यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतली तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलम पाटील यांना सर्वांनी भरभरून दाद दिली. उपक्रम प्रमुख सीमा पाटील यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध नियोजन केले गेले.

या विरंगुळा उपक्रमास सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, खजिनदार संतोष गायकर, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर, सह सचिव नम्रता परदेशी, सहज सेवा युवा अध्यक्षा सागरिका जांभळे, माधवी रिठे, सुरेखा खेडकर, योगिता जांभळे, कल्याणी साखरे, उषा रोठे, विद्या तेलवणे, आशा जाधव, मालती परदेशी, अलका जांभळे, प्रिया परदेशी, विलास पाटील, तुषार खोपे, मिलिंद पाटील, धर्मेंद्र चव्हाण, दिपक मोरे, नवाब शेख, मनस्वी पाटील, निहारिका जांभळे, अनुश्री पाटील आदी उपस्थित होते.

या उपक्रमातून मनाला भावणारा आनंद मिळतो. दर महिन्यात रमाधाम वृद्धाश्रम येथे विरंगुळा उपक्रम करण्याचे आयोजन सहज सेवा फाउंडेशन करणार असुन आजी आजोबांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करणार आहोत, असे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख सीमा मिलिंद पाटील यांनी केले आहे.


तहसिलदार साहेब ! माजी सैनिकाला न्याय द्याल का ?

 



* वर्षभरापासून अवैध भराव, झाडे तोडल्याबद्दल लढा सुरु

*नायब तहसिलदार राठोड यांच्याकडून तक्रारदाराची माहिती उघड

 * तत्कालिन मंडळ अधिकारी गणेश मुंडे यांच्याकडून अरेरावी

* मार्च 2024 पासून वन विभागाकडे तक्रार पण कार्रवाई नाही 

* खालापूर तहसिलदार यांच्याकडून लोकशाही दिनाचा पर्याय

* माजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी तरीही पोलिस प्रशासन धिम्म 

खालापूर / विशेष प्रतिनिधी :- तालुक्यातील कलोते रयती येथील रहिवासी तुषार तुळशीदास येरूणकर हे माजी सैनिक असून 17 वर्ष त्यांनी भारतीय सेनेत सेवा दिली आहे. अन्यायाविरूध्द पेटून उठायचे...देशाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे...देश व समाजाच्या शत्रूंविरोधात जिवाची पर्वा न करता लढा द्यायचा, असे बाळकडू त्यांना सैनिक जिवनात मिळाले आहे आणि त्याच तत्व व मूल्याच्या अनुषंगाने सन 2024 पासून अवैध भराव, उत्खनन व झाडे तोडल्याबद्दल ते लढा देत आहेत, पण खालापूर तहसिल (महसूल), वन विभाग व पोलिस प्रशासनाकडून 'तारीख पे तारीख' देत वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तहसिलदार अभय चव्हाण यांच्या केबीनबाहेर माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असा भला मोठा फलक लावला आहे. पण जानेवारी 2024 पासून माजी सैनिकाचा लढा सुरू आहे आणि अजून न्याय मिळालेला नाही, तरी फलकावर लिहलेल्या ओळी प्रत्यक्षात उतरतील का ? खालापूर तहसिलदार अभय चव्हाण माजी सैनिकाला न्याय देतील का ? असा प्रश्न स्वत: माजी सैनिक येरूणकर यांनी उपस्थित केला आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की, माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 19 मार्च 2024 रोजी चौक मंडळ अधिकारी यांना कलोते रयती सर्वे नं. 10 मध्ये अवैध मातीचा भराव सुरू असल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च 2024 रोजी मंडळ अधिकारी व तलाठी सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी तक्रारदार माजी सैनिक येरूणकर यांना बोलावून घेतले. येरूणकर सदर जागी पोहचल्यावर अरूण आबा येरूणकर, यशवंत आबा येरूणकर, अश्विनी अरूण येरूणकर यांनी माजी सैनिकाला शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. माजी सैनिकाला मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमोर जिवंत गाडण्याची व संध्याकाळी बघून घेण्याची धमकी देण्यात आली. 


दरम्यान, या प्रकरणी माजी सैनिक येरूणकर यांनी खालापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी परस्पर बोलावून प्रकरण निकाली काढले होते. माजी सैनिकाला आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नव्हती. अखेर 13 ऑगस्ट 2024 रोजी माजी सैनिक येरूणकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक यांना लेखी निवेदन देवून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. 20 एप्रिल 2024 रोजी माजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसेच अवैध भराव व झाडे तोडणाऱ्या धनदांडग्यावर खालापूर पोलिस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण जवळजवळ एक वर्ष उलटला तरी कार्रवाई करण्यात आलेली नाही. आजही माजी सैनिक येरूणकर व त्यांचे कुटुंब दहशतीखाली वावरत आहेत तर दुसरीकडे धमकी देणारा मदमस्त आयुष्य जगत आहे... सर्रासपणे अवैध कामे करीत आहे. 


* नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी पुरवली माहिती :- 

कलोते रयती येथे शनिवार, 22 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 नंतर जेसीबी व ट्रकच्या सहाय्याने रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत मातीचा भराव सुरू होता. या घटनेची माहिती माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी तलाठी यांना फोनवरून दिली. त्यानुसार रविवार, 23 मार्च 2025 रोजी तलाठी यांनी सदर जागेवर भेट दिली. तलाठी यांना याबाबत माहिती विचारली असता ते म्हणाले की, शेततळ्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे कृषी विभागाकडे विचारणा केली असता, त्याने फक्त ऑनलाईन अर्ज केला आहे, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तसेच ऑनलाईन अर्ज केलेला सर्वे व प्रत्यक्षात काम सुरू असलेला सर्वे यात तफावत आहे. सरकारी सुट्टी असल्याने कुणीही बाधा घालणार नाही... परवानगीची विचारणा करणार नाही, याची जाणीव असल्याने किंवा तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी सुत जुळल्याने त्यांनीच आयडीया दिली असू शकते, असा आरोप माजी सैनिक येरूणकर यांनी केला आहे. ऐवढेच नव्हे तर सदर जागेचा मालक एक व्यक्ती असून काम वेगळीच व्यक्ती करीत आहे, असा अर्ज माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 25 मार्च 2025 रोजी खालापूर तहसिलदार यांच्या नावाने अर्ज केला होता. परंतु याबाबत अद्याप कार्रवाई करण्यात आलेली नाही. 


दरम्यान, 23 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी खालापूरचे निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज करीत संध्याकाळी 5 ते रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत भराव चालू होता, तरी याबाबत कार्रवाई करावी अशी मागणी केली. परंतु कार्रवाई न करता निवासी नायब तहसिलदार राठोड यांनी सदर व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड केला. सदर मेसेज उत्खनन व भराव करणाऱ्या व्यक्तीला मिळाल्याने माजी सैनिक येरूणकर यांचा जीव दुसऱ्यांदा धोक्यात आला आहे. ऐवढेच नव्हे तर अवैध भराव व उत्खनन करणाऱ्याने आपल्यावर कार्रवाई होवू नये यासाठी संबधित कुटुंबातील महिलेने पोलिस अधीक्षक, सैनिक कल्याण बोर्ड अलिबाग यांना तक्रार केली आहे की, तुषार येरूणकर माजी सैनिक असल्याचा फायदा घेत असून आम्हाला त्रास देत आहे...त्याच्यापासून माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, असा अर्ज केला आहे. निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी सदर मेसेज फॉरवर्ड केल्यामुळेच सदर महिलेने माझ्या विरोधात तक्रार केली आहे, असा आरोप माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी केला आहे. 


चोर तर चोर वर शिरजोर असा प्रकार सध्या खालापूर तालुक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी आपली जबाबदारी न निभावता उलट तक्राराचा जीव धोक्यात घातला आहे. माजी सैनिक येरूणकर यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तसेच गुप्त माहिती, तक्रार व तक्राराची माहिती गुन्हा करणाऱ्यापर्यंत पोहचविणाऱ्या राठोड यांच्यावर कार्रवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी केली आहे. 

* तत्कालिन मंडळ अधिकारी गणेश मुंडे यांच्याकडून अरेरावी :- 

20 एप्रिल 2024 रोजी तक्रारीची चौकशी करण्यासाठी आलेल्या तत्कालिन मंडळ अधिकारी गणेश मुंडे यांनी देखील आपले कर्तव्य न निभावता उलट माजी सैनिक तुषार येरूणकर यांना अरेरावी केली होती. येरूणकर यांनी शासनाची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी फोन केला होता तसेच तसा अर्ज केला होता पण शासनाची मदत करणाऱ्या व्यक्तीवरच शासकीय अधिकारी असलेले...आपली जबाबदारी, कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असलेले गणेश मुंडे व तलाठी माधव कावरखे यांनी कार्रवाईचे नाटक केले होते. 


* मार्च 2024 पासून वन विभागाकडे तक्रार पण कार्रवाई नाही :- 

सर्वे नंबर 10/1 आणि 15 मध्ये नोव्हेंबर - डिसेंबर 2023 काळात झाडे तोडण्यात आली होती. ही झाडे परवानगी घेवून तोडण्यात आली का ? याबाबत 8 जानेवारी 2024 माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी माहिती अधिकार कायद्यांत अर्ज केला होता, परंतु माहिती मिळाली नाही. प्रथम अपिल केल्यानंतर वन विभागाने 18 मार्च 2024 जनमाहिती अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी खालापूर यांनी कलोते रयती सर्वे नंबर 10/1 व 15 मधील कोणत्याही प्रकारची झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आलेले नाही, असे सांगितले. 

दरम्यान, संबधित झाडे तोडणाऱ्यावर कार्रवाई करावी अशी मागणी करणारा अर्ज 19 मार्च 2024 रोजी माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी केला होता. परंतु याबाबत वारंवार अर्ज करूनही कार्रवाई करण्यात आलेली नाही. नेमके वन अधिकारी झाडे तोडणाऱ्यांना का वाचवत आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ऐवढेच नव्हे तर येरूणकर म्हणाले की, खोटा पंचनामा करीत फसवणूक करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन वेळा कार्रवाई करण्याचे आदेश देवूनही कार्रवाई करण्यात आलेली नाही. 

* खालापूर तहसिलदार यांच्याकडून लोकशाही दिनाचा पर्याय :- 

माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 22 एप्रिल 2025 रोजी खालापूर तहसिलदार अभय चव्हाण यांची भेट घेतली व 25 मार्च 2025 च्या अर्जाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच 2024 पासून सुरू असलेल्या लढ्याबाबत देखील येरूणकर यांनी आपबिती सांगितली. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन खालापूर तहसील कार्यालयात राबविला जातो. तरी आपण या लोकशाही दिनात अर्ज करावा, तुमच्या तक्रारीला प्राधान्य देवू असे सांगितले. तुम्ही माजी सैनिक असल्याचा अद्याप फायदा घेतलेला नाही तरी आम्ही आपणांस फायदा देवू, असे तहसिलदार अभय चव्हाण यांनी माजी सैनिक तुषार येरूणकर यांना सांगितले. 


परंतु लोकशाही दिनात तक्रार केल्यावरच कार्रवाई होईल का ? मागील एक वर्षापासून माजी सैनिक तुषार येरूणकर लढत आहेत. वारंवार अर्ज, तक्रारी करीत आहेत...पाठपुरावा करीत आहेत, तहसील कार्यालयात वारंवार येरझाऱ्या मारत आहेत. तहसील कार्यालय, वन विभाग, पोलिस प्रशासन यांच्याशी संपर्कात आहेत. पण त्यांच्या तक्रारीवर तत्काळ कार्रवाई न करता आता लोकशाही दिनाचा पर्याय सुचविण्यात आला तरी प्रशासन अजुन किती दिवस या प्रकरणाचे भिजत घोंगडे ठेवणार आहे. आंदोलन, उपोषण केल्यावरच न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित करून गरज पडल्यास आपण महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या मुंबई येथील निवासाबाहेर कुटुंबासह उपोषणाला बसू असा, इशारा माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी दिला आहे. 



Tuesday, April 22, 2025

भाजपा खोपोली शहराध्यक्षपदी राहुल सखाराम जाधव

 


खोपोली / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडल्या. दरम्यान, 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता खोपोली शहर भाजपचे निवडणूक प्रमुख सुनील घरत यांनी या निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, मावळते शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्यवर्ती कार्यालय खोपोली येथे राहुल सखाराम जाधव यांच्या नावाची घोषणा केली. राहुल जाधव यांच्या शहर अध्यक्ष निवडीची घोषण होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करीत ढोलताशांच्या गजरात पेढे वाटप करीत मोठा जल्लोष केला.

राहुल जाधव यांनी आपल्या कामांच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम जाधव यांचा सामाजिक व राजकीय वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत. पक्ष संघटनेच्या कामात, कार्यक्रमात व आंदोलनात अग्रेसर असणारे राहुल जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवट स्वतः या ब्रिद वाक्याप्रमाणे जात, धर्म, पंथ न मानता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या असलेल्या पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला ही मोठी जबाबदारी दिली आहे. सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटनेची चांगली मोट बांधून, खोपोली शहरात पक्ष बळकट करून, कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करीत आगामी नगर परिषद निवडणूक संपूर्ण ताकतीने भाजप पक्ष लढेल, असे नवनिर्वाचित शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.

खोपोली शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व आपल्यावर विश्वास दर्शवित जबाबदारी दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे, प्रकाश बिनेदार, जिल्हा उपाध्यक्ष तथा खोपोली शहर भाजपचे निवडणूक प्रमुख सुनील घरत, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील, जिल्हा कोर कमिटीचे तसेच खोपोली भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल जाधव यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

याप्रसंगी सरचिटणीस अजय इंगुळकर, उपाध्यक्ष विकास नाईक, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी अत्रे, अपर्णा साठे, युवा मोर्चा अध्यक्ष निकेत पाटील, माजी नगरसेविका अपर्णा मोरे, रामभाऊ पवार, कृष्णा पाटील, प्रमोद पिंगळे, अनिल कर्णुक, संजय म्हात्रे, हिंमतराव मोरे, किर्ती ओसवाल, राजेंद्र शेट्टे, हेमंत भाटिया, प्रिन्सी कोहली, सुरेंद्र जाधव, ऋषी म्हात्रे, रोहित साठे, पियूष महर्षी, शाह, महेश पाटील, प्रमोद वाघ, जयवंत वाघ, संदेश आभानी, सुमिता महर्षी, विमल गुप्ते, विभावरी पाठक, सीमा मोगरे, भारती शहा, हेमा कर्णुक, मीना सिंगाला, प्रल्हाद अत्रे, ललित वेदक, जितू घेलोत, विश्व हिंदू परिषदेचे रुपेश मिस्त्री, रवींद्र जैन, रवी राणावत, भावेश लोखंडे व बहुसंख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांबाबत राज्य सरकार उदासिन

 


* कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे न्यायासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

* खोपोली, कर्जत, उरण नगर परिषदेविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन उफाळले

रायगड / नरेश जाधव :- किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे...भविष्य निर्वाह निधीची दरमहा कपात व भरपाई व्हावी...ईएसआयसी (ESIC) योजनेंतर्गत कार्ड आणि सुविधा मिळाव्यात...गणवेश, रेनकोट, गमबूट, साधने मिळावीत...बोनस वेळेवर मिळावा...यासह कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था उदासिन असल्याने खोपोली, कर्जत आणि उरण नगर परिषदांमधील शेकडो कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला असून 21 एप्रिल पर्यंतच्या मुदतीत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्रवाई झाली नसल्यामुळे 22 एप्रिलपासून कंत्राटी कामगारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत 5 मार्च 2025 रोजी आमरण उपोषण होणार होते, परंतु प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र 1 महिना अर्थात 30 दिवस उलटून गेले तरीही कामगारांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर मंगळवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. 

उरण नगर परिषदेमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदारास युनियन वर्क ऑर्डर न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच किमान वेतन कायद्याचे आणि प्रशासनाच्या परिपत्रकांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उपोषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास खोपोली, कर्जत आणि उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Monday, April 21, 2025

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा खेळखंडोबा

 


* कर्जत आरोग्य विभागाकडून शासनाची फसवणूक

*अधिकाऱ्यांनी विधान परिषदेला दिली खोटी माहिती

 * कोऱ्या कागदावर कुणी महिलेने सही करून देवू नये!

* दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्रवाईची मागणी 

* राज भवनाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन

कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुका आरोग्य खात्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यापासून जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त महिलांना वंचित ठेवल्याचा मुद्दा विधान परिषदेत ‍मांडण्यात आला. यासाठी विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला कर्जत आरोग्य खात्याकडून चक्क खोटी ‍माहिती पुरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे. 

एकीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉं. नितीन गुरव यांनी जिल्हा आरोग्य विभागास लिहीलेल्या पत्रामध्ये लिहीले आहे की, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची कसलीच ‍माहिती त्यांच्याकडे नाही. तर दुसरीकडे, तालुक्यात अनेक गोरगरीब व आदिवासी महिला योजनेच्या लाभापासून वंचित असताना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची कसलीच माहिती कार्यालयात नसताना या योजनेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे उत्तर आरोग्य खात्याकडून विधान परिषदेला देण्यात आले आहे. कर्जत तालुका आरोग्य अधिकारी यांनी दोषी कर्मचारी प्रविण भोईर याला वाचविण्यासाठी शासनाची आणि जनतेची फसवणूक चालवली आहे, असा आरोप आंदोलक पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी केला आहे. 

कंत्राटी समूह संघटक शीतल चौधरी यांनी आशा सेविकांकडील प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी लाभार्थी महिलांची नाव नोंदविलेल्या रजिस्टर मधल्या आकड्यांची दोन वेळा लेखी खोटी माहिती देऊन खोटे सरकारी दस्तऐवज तयार करण्याचा गंभीर गुन्हा केला आहे. तर तालुका लेखापाल अनिता महाडिक ह्यांनी स्वत:ची आणि कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटरची खोटी फिरती बील पास करुन आतापर्यंत हजारों रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केला आहे, असे ही आंदोलक पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड होऊन पण आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा या तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणत्याही वरिष्ठ अधिकारी अथवा प्रशासनाने अजूनपर्यंत काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे तालुका आरोग्य खाते आणि जिल्हा परिषदेने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न चालविलेला आहे हे उघड होत आहे. या कर्मचाऱ्यांवर व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. 

पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी कर्जत तालुक्यातील सर्वच महिलांना मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी सर्व कागदपत्रे गोळा करीत त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयासह राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली असून पाठपुरावा सुरू आहे. या योजनेची चौकशी कासवगतीने सुरू असल्याबद्दल पत्रकार जाधव व लोहोकरे यांनी संताप व्यक्त केला असून मातृत्व वंदना योजना अपहाराबद्दल शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांच्यासह न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनची टीम महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या निवासाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करणार आहे, तसे निवेदन संबधित विभागाकडे देण्यात आले आहे. 

कर्जत तालुका आरोग्य खात्याकडून ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. तसेच कर्जत तालुका आरोग्य खात्याकडून सर्व महिलांकडून त्यांची कागदपत्रे फॉर्म अपडेट करण्याच्या नावाखाली गोळा केली जात आहेत. सर्व महिलांना पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी जाहीर आवाहन केले आहे की, त्यांनी आशा सेविकांना कोऱ्या कागदावर किवा रजिस्टरवर सह्या देऊ नये आणि फॉर्म अपडेट करण्यासाठी जर कागदपत्रे घेतली असतील तर अपडेट केलेल्या फॉर्मची प्रिंट आशा सेविकांकडून घ्यावी व त्यामध्ये बाळाची जन्मतारीख तपासून बघावी. बाळाची जन्म तारीख सरकारी पोर्टलवर ऑनलाईन चुकीची भरली तर पुढे समस्या निर्माण होऊ शकते म्हणून फॉर्ममध्ये आपल्या बाळाची जन्मतारीख चुकीची असली तर याची माहिती आम्हाला 9923221188, 7844863333, 82751 50331या दुरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वीटभट्टी व्यावसायिकांचा भंडारा !

 


* अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाप्रसादाचा लाभ ?

* खालापूर तालुक्यात महसूल विभागाचा दुर्लक्षपणा ?

* 250 ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारोंचे डोंगर ?

रायगड / विशेष प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून उत्खनन व भरावाची कामे राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र आहे. उत्खनन व भरावासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी घेवून रॉयल्टी भरणा केल्याशिवाय उत्खनन व भराव करता येत नाही. उत्खनन व भराव करण्यासाठी शासनाचे अनेक नियम, अटी शर्ती आहेत. मात्र, खालापूर तालुक्यात हे नियम लागू आहेत की नाहीत असा प्रश्न जागोजागी सुरु असलेल्या उत्खनन व भरावाची कामे पहिल्यावर पडतो. तसेच तहसील कार्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर वीटभट्टीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणत सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात वीटभट्टीचे व्यवसाय करणाऱ्यांना खालापूर तहसील प्रशासनाने 250 ब्रास रॉयल्टी भरणा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी रॉयल्टीचा भरणा केला. मात्र, 250 ब्रास रॉयल्टी भरणा आणि वीटभट्टीवर हजारो ब्रास मातीचे डोंगरचे डोंगर लावण्यात आले असतांना तहसीलदार यांचा दुर्लक्षपणा का होत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

तालुक्यात बिनशेती नसलेल्या जागेत व्यवसाय करणाऱ्यांना तहसील प्रशासनाकडून दंडाची नोटीस बजाविण्यात येते. मात्र, वीट भट्टीचा व्यवसाय करण्यासाठी जागा बिनशेती नसतांना...प्रदूषण विभागाची परवानगी नसतांना...रॉयल्टी नियमांचे पालन होत नसताना त्यांच्यावर कार्रवाई का होत नाही ? वीट भाजण्यासाठी चिमणी नसून सरळ भट्टीमधून निघणारा धुर व होणाऱ्या प्रदूषणाच्या त्रासाने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त असताना प्रातांधिकारी, तहसीलदार व महसूल विभागाकडून यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? हे वीट व्यावसायिक पेक्षाने कुंभार आहेत का ? अडीचशे ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मातीचे डोंगर लावले जात असतांना तहसीलदार अभय चव्हाण यांच्यावर कार्रवाई करतांना का दिसत नाहीत ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

खालापूर तालुक्यात दिवसेंदिवस डेव्हलपमेंट (विकास) होत चालला आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडे, मुरूम, दगर, मातीचे डोंगरचे डोंगर भुईसपाट होतांना दिसून येत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून देखील वीटभट्टीसाठी माती काढून शेती नापिक केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी रॉयल्टी न भरता बिनधास्तपणे दगड, मुरूम, लाल मातीची वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. 100 ब्रास रॉयल्टीसाठी अंदाजे 90 ते 95 हजार रुपये शासनाला भरावे लागतात. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 100 ते 200 ब्रास रॉयल्टीचे पैसे भरून आणि महाप्रसाद देऊन हजारों ब्रासचे भराव व उत्खनन 'साहेबां'च्या आशिर्वादाने केले जात असल्याचे एका व्यावसायिकानेच नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले. तसेच वीटभट्टीची रॉयल्टी भरण्यासाठी एका दलालाकडे वीट व्यावसायिकांचा 'महाप्रसाद' देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका वीटभट्टी व्यावसायिकांनी अडीचशे ब्रास रॉयल्टी भरून अंदाजे तीन ते साडे तीन हजार ब्रास मातीचा डोंगर लावला असल्याचे समजते. मात्र, इतके असतांना सुध्दा तहसीलदार कार्रवाई करण्याकडे दुर्लक्ष का करीत आहेत ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी तहसिलदार अभय चव्हाण यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट होवू शकली नाही. निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना देखील दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ही फोन घेतला नाही.

आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या साक्षीने कर्जत नगरपरिषद अंडरआर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग २०२५ – पर्व २ चा जल्लोषात भव्य समारोप..!

 


कर्जत/प्रतिनिधी:-  क्रिकेटचा उत्साह, तरुणाईचा जोश आणि कर्जतच्या एकतेचं प्रतीक ठरलेली कर्जत नगरपरिषद अंडरआर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग २०२५ – पर्व २ या स्पर्धेचा समारोप सोहळा थाटात आणि जल्लोषात पार पडला. या अंतिम दिवशी कर्जत-खालापूरचे कार्यसम्राट आमदार श्री. महेंद्र थोरवे यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थित खेळाडूंना आणि प्रेक्षकांना प्रेरणा दिली.


या बहुचर्चित स्पर्धेचे आयोजन आमदार थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या पर्वात तब्बल ३२ संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला एक वेगळा दर्जा आणि ओळख प्राप्त करून दिली. स्पर्धे दरम्यान रंगलेली चुरस, संघांतील खेळाडूंचा झोकून दिलेला सहभाग आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद हेच या भव्य आयोजनाचं यश दाखवून देत होतं.
समारोपप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे मनापासून पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. “क्रिकेट हा संघभावनेचा आणि जिद्दीचा खेळ आहे. या स्पर्धेने केवळ खेळ नाही, तर आपली एकता आणि ऊर्जा दाखवली आहे. कर्जत शहराचा पर्यटनदृष्ट्या नवा चेहरा घडवण्यासाठी तुमच्या साथीने मी निश्चयाने पुढे चाललो आहे. कर्जतला नंदनवन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही,” असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे ह्यांनी दिला.ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या शिवसेना कर्जत शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. आपण एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आयोजित केली आणि खेळाडूंना व्यासपीठ दिलं आहे. यामधून भविष्यात अनेक असे क्रिकेटर घडतील आणि संपूर्ण कर्जतकरांना त्याचा अभिमान वाटेल.
कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक ॲड. संकेत भासे ह्यांनी कर्जतकरांनी पुन्हा एकदा विश्वादाने आमदार थोरवे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
स्पर्धेच्या मैदानावर उभी राहिलेली तरुणाईची ऊर्जा आणि प्रेक्षकांचा जल्लोष हा स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णक्षण होता.
या समारोप सोहळ्याला शिवसेना कर्जत शहरचे सर्व पदाधिकारी, संघमालक, खेळाडू आणि शेकडो कर्जतकर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



"युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात राबवण्याचा आमचा संकल्प आहे," असा निर्धारही यावेळी शिवसेना पदाधिकर्यांनी व्यक्त करण्यात आला.

Sunday, April 20, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 


अंधार नष्ट करण्या जन्म झाला महामानवाचा,
दुर केल्या रूढी, परंपरा नाश करून दानवांचा!
सुर्य उगवला प्रकाशाचा, प्रवास ज्ञान सुर्याचा,
भारताचा शिल्पकार, पुत्र माता भीमाईचा !!

हातात धरूनी लेखणी केली निर्मिती संविधानाची,
सत्याग्रह करून महाडचा, तहान भागवली भुकेल्याची।
14 एप्रिल दिनी जन्मला हा तारा विश्वरत्न जगाचा,
कायदेपंडित भारताचा, पुत्र पिता रामजीचा !!

स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा शिक्षक,
मागासलेल्या समाजाचे बाबासाहेब रक्षक।
गरिबीला झुगारून ध्यास होता समाज घडविण्याचा,
इतिहास घडविला देशामंध्ये समाजाला घडविण्याचा !!

कायदेमंत्री, भारतरत्न यावर नाव तुम्ही कोरले,
समाजाला कायम तुम्ही कुटुंबच बनवले।
क्रांती केलीत अशी की जगाचा झालात विधाता,
प्रेरणास्थान तुम्ही युवकांचे बनलात त्यांचे पिता!!

मानसी कांबळे (निवासी संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्युज)

Saturday, April 19, 2025

कर्जत नगरपरिषद अंडरआर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग २०२५ – पर्व २चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!



 कर्जत/नरेश जाधव :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कर्जत नगरपरिषद अंडरआर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग २०२५ – पर्व २ या बहुचर्चित क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.



उपजिल्हाप्रमुख भाई गायकर व माजी उपनगराध्यक्ष कर्जत नगरपरिषद अशोक ओसवाल यांच्या शुभहस्ते आणि कर्जत नगरपरिषदचे माजी नगरसेवक ॲड. संकेत भासे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.

या वर्षीच्या पर्वात तब्बल ३२ संघांनी सहभाग नोंदवला असून, स्पर्धेला सुरुवातीपासूनच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना ॲड. संकेत भासे म्हणाले, “आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना व्यासपीठ देणं, त्यांचं कौशल्य समोर येणं, हा आमचा मुख्य हेतू आहे. कर्जत-खालापूर परिसरात खेळसंस्कृती वाढावी यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे.”

या सोहळ्यास शिवसेना कर्जत शहर सर्व पदाधिकारी ,संघमालक, सर्व खेळाडू, व शेकडो प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Thursday, April 17, 2025

अंबपवाडी येथील मिटर जोडणीस आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हाकलले

 


कोल्हापुर/किशोर जासूद :- मागील काही दिवसांपासून अंबपवाडीसह परिसरातील गावांमध्ये स्मार्ट मीटर जोडणी मोहीम महावितरणे सुरू केली आहे. ग्राहकाला स्मार्ट मीटरचा विरोध असतानाही स्मार्ट मीटर जोडले जात होते. मंगळवारी अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथे स्मार्ट मीटर जोडणीस आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना येथील महिलांनी हाकलून लावले. 

        ग्राहकाला एखादी वस्तू नको असताना विनाकारण त्याच्या माथी मारणे हे कोणत्या कायद्यात बसते. स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास अगोदर धन दांडग्यांच्या बंगल्यावर मोठमोठ्या कंपन्यांत बसवा शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. असा पवित्रा घेत गावातील नागरिक व महिलांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिटर जोडणीपासून रोखत धारेवर धरले.

कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेण्याचा फंडा!

 



* मातृत्व वंदन योजना : कर्जत गटविकास अधिकारी सुशांत पाटील, आरोग्य अधिकारी डॉं. नितीन गुरव यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी

कर्जत / प्रतिनिधी :- मातृत्व वंदना योजनेच्या लाभापासून हजारो महिलांना वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी तसेच मातृत्व वंदना योजनेत झालेल्या अपहाराची केंद्रीय समिती मार्फंत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबधित विभागाकडे केली आहे. या योजनेची केंद्र व राज्य स्तरावरून चौकशी सुरू झाल्यानंतर संबधितांच्या पायाखालची वाळू सरकली असून आपली चुकी लपविण्यासाठी आता 3-4 वर्षापूर्वी अर्ज केलेल्या पण लाभ न मिळालेल्या महिलांची कोऱ्या कागदावर सही घेतली जात असल्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर एका महिलेला बँक खाते चुकल्याने तुमचे पैसे दुसऱ्या खात्यात गेल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, या योजनेची सत्यता पडताळण्यासाठी राजेंद्र जाधव यांनी कर्जत तालुक्यातील अनेक महिलांची भेट घेतली असून कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा महिलांचा व्हिडिओ देखील आपल्या जवळ असून आपण केंद्रीय समितीला हा व्हिडिओ देवू. ही सही ज्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे, त्याच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करू असे जाधव यांनी सांगितले. 

पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी कर्जत तालुक्यातील सर्वच महिलांना मातृत्व वंदन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी सर्व कागदपत्रे गोळा करीत त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली असून पाठपुरावा सुरू आहे. या योजनेची चौकशी कासवगतीने सुरू अहल्याबद्दल जाधव व लोहोकरे यांनी संताप व्यक्त केला असून मातृत्व वंदन योजना अपहाराबद्दल शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांच्यासह न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनची टीम महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या निवासाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. 

याबाबत पत्रकार राजेंद्र जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, आरोग्य मंत्री, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक, कर्जत प्रातांधिकारी, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत तहसिलदार, कर्जत पोलिस निरीक्षक आदी संबधित विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. राज्यपाल यांच्या निवासाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करूनही एक महिन्याच्या आत या योजनेचे सत्य उघड न केल्यास, अपहाराची केंद्रीय समिती मार्फंत चौकशी न झाल्यास, गटविकास अधिकारी सुशांत पाटील व डॉं. नितीन गुरव यांची विभागीय चौकशी न झाल्यास राज्यपाल निवासाबाहेर आत्मदहन करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा देखील आंदोलक न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी केली आहे.

5 वर्षांच्या मुलींवर बस क्लिनरकडून अत्याचार

 


* कर्जतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

* पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, सर्वत्र संतापाची लाट

* राजकिय नेत्यांकडून प्रकरण दाबण्यासाठी दबाव ? 


कर्जत / नरेश जाधव :- सुसंस्कृत कर्जत तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंतःकरण हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन मुलींवर स्कूल बसमधील क्लिनरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


आरोपी करण दीपक पाटील (वय 24, रा. वदप, ता. कर्जत) याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.


याबाबत पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितले की, स्कूल बसमधील क्लिनर करण हा त्यांना बस ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसायला लावत असे. त्यानंतर त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या खाजगी भागांना अश्लीलरीत्या स्पर्श करायचा. जर त्या बसायला नकार देत, तर तो त्यांना मारहाण करायचा. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याचे मुलींच्या पालकांनी सांगितले. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, शाळा व स्कूल बस खरंच सुरक्षित आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचविण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांवर राजकीय नेत्यांकडून दबाव टाकल्याचा आरोप पीडितांच्या आईने केला आहे. त्यामुळे संताप अधिक वाढला असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.


दरम्यान, पालकांकडून स्कूल बस मालकाची सुद्धा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच आरोपी करण पाटील आणि ज्यांचा या प्रकरणाशी थेट व अप्रत्यक्ष संबंध आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी केली आहे.




सुभाषनगर येथे डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...

 


खोपोली / मानसी कांबळे :- सुभाषनगर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवन सुभाषनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सुरूवातीला दिप प्रज्वलन तसेच सुगंध पुजन करीत उपासक शैलेश ओव्हाळ आणि उपासिका भावना ओव्हाळ यांनी धम्मपूजा केली. यावेळी माजी नगरसेवक मंगेश दळवी, माजी नगरसेवक नितीन मोरे, सामाजिक कार्यकर्ते संपत गाढवे, मिलिंद शिंदे, आनंद सोनवणे, पत्रकार फिरोज पिंजारी, जितू गेहलोद आदी उपस्थित होते.




यानंतर संध्याकाळी महिला व मुलांच्या करमणुकीसाठी सांस्कृतिक तसेच खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक मंगेश दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या शिवानी मंगेश दळवी, भावी नगरसेवक अल्पेश थरकुडे, उद्योजक गोकुळ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संपत गाढवे, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अशोक गिलबिले, उपाध्यक्ष शब्बीर शेख, उद्योजक इस्राईल मन्सुरी, फारूक शेख आदी उपस्थित होते.

'माय कोकण' वेब पोर्टल धुमधडाक्यात सुरू


* युवा नेत्या शिवानी दळवी, युवा नेते अल्पेश थरकुडे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्या हस्ते उद्घाटन 


खोपोली / प्रतिनिधी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय महासचिव तथा भिमकन्या मानसी गणेश कांबळे यांच्या 'माय कोकण 24 तास' वेब पोर्टलचे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर युवा नेत्या शिवानी मंगेश दळवी, युवा नेते अल्पेश थरकुडे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, क्रिडा (स्पोर्ट्स), क्राईम, मनोरंजनात्मक, अध्यात्मिक बातम्या, लेख देण्यासह सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संपादिका मानसी कांबळे करतील, असा विश्वास उद्घाटन प्रसंगी व्यक्त करण्यात आला. संपादिका मानसी कांबळे यांनी 'लाईट ऑफ लाईफ' ट्रस्टच्या माध्यमातून पत्रकारीतेचा कोर्स केला असून दै. अक्षराज, सारथी महाराष्ट्राचा वेब पोर्टलला खालापूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले आहे तर दै. कोकण प्रदेश न्यूजला निवासी संपादिका म्हणून काम करीत आहेत. मागील 2 वर्षात मानसी कांबळे यांनी आपल्या लेखणीने खालापूर-कर्जत तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मानसी कांबळे या पत्रकारासोबतच एक चांगल्या कवियित्री देखील आहेत, त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्र, पोर्टलमधून प्रकाशित झाल्या आहेत. 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुभाषनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली स्व-लिखित कविता सादर करून भिम अनुयायींची वाहवा मिळवली होती. 

संपादिका मानसी कांबळे यांना वडील गणेश चरू कांबळे, आई गिता गणेश कांबळे, भाऊ केतन गणेश कांबळे यांची भक्कम साथ मिळत आहे. 'माय कोकण 24 तास' सुरू झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक मंगेश दळवी, नितीन मोरे, युवा नेत्या शिवानी मंगेश दळवी, अल्पेश थरकुडे, उद्योजक गोकुळ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संपत गाढवे, अशोक गिलबिले, शब्बीर शेख, इस्राईल मन्सुरी, फारूक शेख, मिलिंद शिंदे, आनंद सोनवणे, जितू गेहलोद, कृष्णा (बाबू) किलंजे, फरीद शेख, सुखदेव बट्टेवार, सचिन सावंत, संतोष आत्माराम गायकवाड, संतोष नामदेव गायकवाड, चेतन कांबळे, वामन शिंदे, आकाश कांबळे, यश गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, किरण गायकवाड, शशिकांत सोनवणे, समाधान कांबळे, जावेद पटेल, युसुफ शेख, शाहरूख शेख आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच नविन वेब पोर्टल सुरू केल्याबद्दल न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण कोळआपटे, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा सना बेगम, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय महासचिव अश्वनी कुमार, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, सचिव ॲंड. अरविंद कुमार, सचिव धवल माहेश्वरी, राष्ट्रीय सहसचिव लतेश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉं. अकबर शेख, राष्ट्रीय युवा सचिव फैजान सुर्वे, राष्ट्रीय कमिटी सदस्य किशोर कुमार मोहंती, राष्ट्रीय प्रसिध्दी प्रमुख तुषार तानाजी कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, महिला प्रदेशाध्यक्षा इशिका शेलार, महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रतिभा शेलार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉं. अर्चना मेडेवार, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तनुजा गुळवी, हरियाणा प्रदेश अध्यक्ष हेमेंद्र कुमार शर्मा, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष आनंद कुमार राजनौली, प्रदेश संयोजक रविश हेगडे, उत्तर प्रदेश महासचिव अनिस कुरेशी, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष कमल शुक्ला, राजस्थान प्रदेश अध्यक्ष ओम प्रकाश जैन, ओडीशा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद कुमार रॉय, मध्य प्रदेश सचिव अयाज हुसैन, महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनिल कुमार पालिवाल, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन पाटणकर, अकोला जिल्हाध्यक्ष मो. जुनेद मो. युसुफ, ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, नांदेड जिल्हा महासचिव जावेद अहमद, रायगड जिल्हा सचिव सागर जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, कर्जत तालुका अध्यक्ष पंकेश जाधव, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद, खोपोली शहर सचिव परमेश्वर कट्टीमणी, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रविंद्र सकपाळ, हर्ष कसेरा, पत्रकार संतोष मोरे, संतोष गोतारणे, गणेश मोरे, किशोर साळुंखे आदींनी अभिनंदन केले आहे.