खोपोलीकरांचे 70 लाख रुपये परत करा !
* मुख्याधिकारी यांच्याविरोधात 'आप' आक्रमक * टाटा पॉवरची परवानगी नसताना अनधिकृत बांधकाम * उच्च न्यायालयाचा खोपोली नगर परिषदेला दणका * अनाधिकृत बांधकामाला दिली स्थगिती खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये आपल्या खिशातून परत करावे अथवा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील शाळेच्या समोरील मैदानावर नगर परिषदेमार्फत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर मैदानावरून टाटा पावर कंपनी व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्ट असलेली उच्चदाबाची विद्युत वाहिनी जात असून नगर परिषदेने सदर बांधकाम करण्याकरीता कोणतीही परवानगी घेतली नाही. टाटा पावर कंपनीतर्फे नगर परिषदेला सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. नगर परिषदेने सदर बांधकाम करण्यापूर्वी टाटा पावर कंपनीची व मध्य रेल्वेची परवानगी घेणे अनिवार्य होते, परंतु तसे न केल्यामुळे नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये वाया गेले आहे. तरी खोपोली नगर प...