धास्तावलेला शेतकरी आकाशाकडे पाहत मळणी करतोय अंतिम टप्प्यात भात झोडणी
चौक / अर्जुन कदम :- हातातोंडाशी आलेले भाताचे पीक पावसाने थैमान घालून नेले, पण पावसाशी टक्कर देऊन शेतकरी भिजलेले भात पिक घेऊन झोडणी करताना दिसत आहे.
रायगड हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, आजही येथील शेतकरी यांच्यामुळे ओळखले जाते, पण एप्रिल महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस वेळेपूर्वी मे महिन्यात सुरू झाला तो पावसाळी हंगाम संपला तरी पडतच होतो, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पावसात महापूर,शेतात पाणी, शेताची बांध बंदिस्ती बरोबर शेती माती वाहून गेली, तरीही कणखर शेतकरी यांनी आपल्या भात शेतात भात पिकवले, भात पिक तयार झाले, पण पाऊस भात पिक कापून देत नव्हता. दिवाळी नंतर शेतकरी आकाशाकडे बघून कापणी करीत होता, साठवलेली भात शेतीची मळणी देखील करून देत नव्हता, अशा परिस्थितीत कोकणातील शेतकरी यांनी शेती साठवली. आता पावसाचा अंदाज घेऊन तो झोडणी करायला लागला आहे, एका बाजूला झोडणी तर दुसऱ्या बाजूला मळणी करून काढलेले भात सुकवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी देखील तो आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. इतकी भीती पावसाची घेतली आहे.
आजही कापणी करतांना शेतातील पाणी बाजूला करून भात कापावे लागत आहे. पेंडा म्हणजे वैरण काळी पडली असून भातही भिजून काळे पडले आहे. पण हाडाचा शेतकरी हवामानावर मात करून आपल्या शेतातील भात पिक काढण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home