एकवीरा देवी ग्रुप चौक परिसर यांच्यावतीने कार्ला पायी दिंडी
चौक/अर्जुन कदम:- सालाबाद प्रमाणे यंदाही एकवीरा देवी ग्रुप चौक परिसर यांच्या वतीने चौक ते आई एकवीरा देवी कार्ला अशी पायी दिंडी काढण्यात आली, त्यास चौक परिसरातील आई एकवीरा देवी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सामाजिक कार्यकर्ते आणि आई एकवीरा देवी भक्त नंदू हातमोडे यांनी याही वर्षी चौक ते आई एकवीरा देवी कार्ला लोणावळा अशी पायी दिंडी काढली होती, त्यास या परिसरातील आई एकवीरा भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चौक ते कार्ला अशी पायी चालत वारी केली.या दिंडीचे जागोजागी स्वागत करून आई एकवीरा देवी ची पूजा करण्यात आली.चौक परिसरातील आई एकवीरा देवी भक्त हेही या दिंडीत सहभागी झाले होते. विनोद भोईर, सागर ओसवाल, सुभाष पवार यांच्यासह अनेक भक्तांनी पायी चालत दिंडीत सहभाग घेतला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home