कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्षप्रवेश
* रायगडातील माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह विविध पक्षातील पदाधिकारी राष्ट्रवादीत
* आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी ही जाहीर
कर्जत / मानसी कांबळे :- कर्जत येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात विविध पक्षांतील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला मोठी बळकटी दिली. या कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षीय आढावा बैठकही पार पडली.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व बांधकाम, अर्थ व नियोजन सभापती पुंडलिक ऊर्फ बंधू पाटील, शिवसेना शिंदे गटाचे कर्जत-खालापूर विधानसभा संघटक पंकज पाटील, माजी नगरसेविका पुष्पा हरिश्चंद्र दगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव जे. पी. पाटील, युवा नेते दिनेश जाधव, खोपोलीचे माजी नगरसेवक चंद्रप्पा अनिवार, मधुकर दळवी, माजी नगरसेविका खोपोली मेघा वाडकर, माजी नगरसेविका खोपोली चंद्रभागा चंद्रप्पा अनिवार, सामाजिक कार्यकर्ते योगेश मारुती गायकवाड, धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम बाबू आखाडे, धनगर समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबू धोंडू ढेबे, रामचंद्र नारायण ढेबे, अभिजीत विजय राणे, राजेंद्र साखरे, शिवसेना शिंदे गट बीड जिल्हा परिषद विभाग संघटक मनोज वसंत बोडके, माथेरान शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्नेहा संतोष चव्हाण, खरीवली पंचायत समिती शिवसेना सहसंघटक सतीश बाबाजी मोरे, झाडाणी युवासेना शाखा प्रमुख शंकर रखमाजी मोरे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जाहीर पक्षप्रवेश केला.
नवीन प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पक्षाकडून त्यांच्या कार्यक्षमतेचा गौरव करून अनेकांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पक्षात मजबूत योगदान देण्यासाठी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने माथेरान नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी अजय सावंत यांची, तर कर्जत नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी पुष्पाताई दगडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
या कार्यक्रमास जेष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, रायगड जिल्हा प्रमुख प्रवक्ते भरत भाई भगत, सरचिटणीस एकनाथ धुळे, कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर, कर्जत तालुका अध्यक्ष दिपक श्रीखंडे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home