Wednesday, November 12, 2025

स्वच्छता अभियान व एक तास श्रमदान” उपक्रम उत्साहात पार पडला!

 

विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ (नियोजित), म्हाडा वसाहत शिरढोण 

समाजसेवेचा आदर्श उपक्रम - रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग, स्वच्छतेबाबत जनजागृतीचा सुंदर संदेश

खालापुर / प्रतिनिधी :- समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ (नियोजित), म्हाडा वसाहत शिरढोण यांच्यावतीने “वसाहत स्वच्छता अभियान आणि एक तास श्रमदान” हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत वसाहतीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि परिसराची स्वच्छता जोमाने पार पाडली.

‘श्रमदान’ म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी शारीरिक श्रमाचे ऐच्छिक योगदान. रस्ते स्वच्छ करणे, वृक्षारोपण करणे, नाले साफ करणे, परिसर स्वच्छ ठेवणे या कार्यांद्वारे नागरिकांमध्ये एकता, जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता वाढते. 'श्रम’ म्हणजे कष्ट आणि ‘दान’ म्हणजे देणे, त्यामुळे श्रमदान म्हणजे कष्टाचे दान, आणि त्यातून समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते.

मंडळाने बिल्डिंग क्रमांक 1A, 1B, 1C आणि 1D या वसाहतींच्या परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून रहिवाशांना स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाद्वारे “स्वच्छ वसाहत – निरोगी समाज” हा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. रहिवाशांनी एकत्रित येऊन कचरा संकलन, रस्त्यांची झाडाझडती, परिसर धुलाई आणि झाडांना पाणी देणे अशा विविध क्रियांत सहभाग घेतला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाजातील लोकांना “आपला परिसर स्वच्छ ठेवा - आपले आरोग्य जपा” हा संदेश दिला.

या उपक्रमाचे आयोजन मंडळाचे आधारस्तंभ सुबोध सावंत, कार्याध्यक्ष गणेश यावलकर, अध्यक्ष भगवान पोपळे, सचिव गणेश पारेकर, आणि खजिनदार गणेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या मोहिमेत पवन साळुंखे, नानासाहेब रोकडे, अजिंक्य वडगणे, अण्णा राऊत, रोहित कारभारी, अजिंक्य टोम्पे, अमोल टोम्पे, फिरोज शेख, गणेश वटे, सोमनाथ कोल्हे, शुभम पाटील, अक्षय पाटील, प्रजल पाटील, संतोष किर्ते, दत्तू महाजन, महेश डोके, अभिषेक मगर, नितीन दुवे, बाळू यावलकर, गणेश मोरे, नारायण भोसले, रितेश चव्हाण, रुपेश चव्हाण, संदीप कदम, अमोल कुळवेकर, उमेश खराडे, प्रवीण शिंदे, ओंकार भादुले, संतोष रुपनर, सुमित पोपळे, अरविंद सिंघम, दिनेश पवार, तुषार कोपळे, राजगुरू आदी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.

विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाने समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छता आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. या उपक्रमातून “स्वच्छ समाज - सुंदर समाज” या संकल्पनेला बळकटी मिळाली आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home