घुरुपकोंड शाळेच्या मुख्याध्यापिका व सृष्टी प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ .स्मिता अमर जोष्टे/ नवघरे यांना कोकण रत्न पदवी"पुरस्कार २०२५जाहीर.
खालापुर कर्जत/प्रतिनिधी :- स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे "कोकण रत्न" पुरस्कारसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षिका व सामाजिक कार्य करणारी संस्था सृष्टी प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ.स्मिता अमर जोष्टे यांना त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे.
हा पुरस्कार ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते संस्थापक अध्यक्ष श्री.संजय कोकरे सर,प्रमुख पाहुणे व वरिष्ठ पत्रकार श्री.सचिन कळझुनकर सर,तसेच पदाधिकारी श्री धनंजय कुवडेकर ( मुंबई अध्यक्ष),श्री.राजेंद्र सुर्व (खजिनदार) ,श्री.सुभाष राणे ( नेते),आणि श्री.दिलीप लाड (मुख्य सल्लागार) या सर्वांचे मनापासुन आभार मानले. सौ.स्मिता जोष्टे यांनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप, गावातील किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व पॅड वाटप. नाटिका लेखन रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा,विविध शैक्षणिक स्पर्धेमध्ये सहभाग, शिक्षकांसाठी मार्गदर्शक तज्ञ अशा अनेक सामाजिक व शैक्षणिक कामातुन लोकांची व गरीब मुलांना शिक्षण क्षेत्रात मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या कार्या बद्दल मनापासून अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव सर्व


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home