खालापूर तालुक्यातील शाळांमधून बालदिन साजरा
चौक /अर्जुन कदम:- रायगड जिल्हा परिषद शाळा मधून खालापूर बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांनी औक्षण करून पुष्प देत तोंड गोड करून स्वागत केले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थी विविध वेशभूषा करून शाळेत आले होते. चाचा नेहरू, चित्रपटातील पुष्पा, वारकरी, स्पायडरमॅन तर कुणी मच्छी विक्री करणारी कोळीण अशा विविध वेशभूषा करून शाळेत आले होते.विविध नृत्याने आजचा बालदिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.यावेळी मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.विद्यार्थ्यांची भाषणे,गाणी व काही मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,स्वयं सेवक,अंगणवाडी सेविका आदींसह पालक उपस्थित होते.
वर्षभर मुले अभ्यासच करत असतात पण काहीतरी वेगळं करण्यासाठी बालदिनाच्या औचित्याने वेशभूषेचे उपक्रम घेण्यात आले,मुलांचा उदंड प्रतिसाद या निमित्ताने लाभला असे मुख्यमंत्री माझी शाळा पुरस्कार विजेते सुभाष राठोड यांनी सांगितले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home