Tuesday, November 11, 2025

दानशूर व्यक्तिमत्त्व बबलू टेकाळे यांच्या लोकविश्वासाचा लाभ नगराध्यक्ष पदासाठी विजयमाला टेकाळे सह संपूर्ण राष्ट्रवादीला होणार..!

 


देगलूर/प्रतिनिधी :- देगलूर शहरातील सामाजिक कार्य आणि लोकसेवेच्या बळावर देगलूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, जनमानसात विश्वास निर्माण केलेल्या बबलू टेकाळे सह कुटुंबाने आगामी नगरपरिषद निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्ष पदासाठी विजयमाला बालाजी टेकाळे या उमेदवार म्हणून पुढे येणार असून, प्रभाग क्रमांक ९ मधून एकनाथ (बबलू) टेकाळे नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला देगलूरमध्ये नवे नेतृत्व, उत्साह आणि संघटनबळ लाभले असल्याची प्रतिक्रिया शहरात उमटत आहे.

      ‘खुशी सेवाभावी संस्था’च्या माध्यमातून बबलू टेकाळे हे अनेक वर्षांपासून निःस्वार्थ सामाजिक कार्याचा वारसा जपत आहेत. पूरग्रस्त आणि गरजू कुटुंबांना मदत, अन्नदान उपक्रम, अंध आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अनेक रुग्णांना मदत, गोरगरिबांना लग्नासाठी मदत तसेच गरज भासल्यास कोणत्याही व्यक्तीच्या मदतीसाठी तात्काळ धाव घेण्याची वृत्ती बबलू टेकाळे म्हणजे गरज पडेल तिथे तात्काळ उभे राहणारे दानशूर व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख नागरिकांत मजबूत झाली आहे. या लोकाभिमुख सेवाभावी कार्यामुळे देगलूर शहरात त्यांच्याप्रती असलेला जनविश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

      हा व्यापक सामाजिक विश्वास आणि लोकसंपर्काचा थेट लाभ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयमाला टेकाळे यांच्या उमेदवारीस मिळणार आहे. बबलू टेकाळे कुटुंबाचे सामाजिक योगदान व संपर्काची व्याप्ती ही केवळ एखाद्या प्रभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण देगलूर शहरभर पसरलेली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जनाधाराची पायाभरणी अधिक सक्षम होत आहे.

      यामुळे, आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस देगलूरमध्ये मजबूत आणि प्रभावी स्पर्धक म्हणून उभी राहत असून, “लोकसेवा आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास” हेच या निवडणुकीचे केंद्रबिंदू असणार असल्याचे स्पष्ट होत आहे..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home