Sunday, November 16, 2025

निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी

 


खोपोली नगरपरिषद निवडणूक 2025 : मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततापूर्ण व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आज लायन्स क्लब सभागृह, खोपोली येथे निवडणूक कर्मचाऱ्यांचे सर्वंकष प्रशिक्षण घेण्यात आले. शहरातील विविध शासकीय विभागांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.


* मतदान केंद्र व्यवस्थापनापासून आपत्कालीन परिस्थितीपर्यंत सखोल मार्गदर्शन :- या प्रशिक्षण सत्रात मतदान केंद्राची पूर्वतयारी, मतदान दिवशीची चरणबद्ध प्रक्रिया, मतदारांना योग्य मार्गदर्शन कसे करावे, मॉक पोलची पद्धत, सीलिंग प्रक्रिया, मतदान केंद्राचे व्यवस्थापन, तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थिती कशी हाताळावी, तसेच मतदान केंद्रावर कोणतीही चूक होऊ न देण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी याची स्पष्ट मांडणी केली.


* शिस्तबद्ध सत्र, कर्मचाऱ्यांची सकारात्मक तयारी :- सभागृहात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असूनही संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि समन्वयातून पार पडला. कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व नियम व जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडण्याची तयारी असल्याचे सांगितले. प्रशिक्षणामुळे मतदान दिवशीची प्रक्रिया अधिक गतीमान, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home