तांबटी ठाकूरवाडीतील अंगणवाडी व प्राथमिक शाळा येथे बालदीन उत्साहात साजरा........
नागरी सामाजिक विकास संस्थेकडून विद्यार्थ्यांना खाऊ व वस्तू वाटप....
खालापुर/प्रतिनिधी :-१४ नोव्हेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल चाचा नेहरू यांच्या जन्मदिना निम्मित साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल दिनाचे औचित्य साधून नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने तांबटी ग्रामपंचायत मधील ठाकूरवाडी तील अंगणवाडी व तांबटी गावातील प्राथमिक शाळेतील बालकांना खाऊ वाटप करून चाचा नेहरू यांच्या जन्मदिना निमित्त केक कापून बालकांना केक चे वाटप करण्यात आले.
अंगणवाडी व रायगड जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमात लहान मुलांसाठी विविध आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच मुलांसोबत केक कापून बालदिन साजरा करण्यात आला. चाचा नेहरू यांचे बालकांवर विशेष प्रेम होते, जिथे बालके भेटतील तेव्हा ते त्यांच्या मध्ये रमून जायचे, आणि तोच आनंद आणि उत्साह तांबटी तील छोट्या विद्यार्थ्यावर दिसला. कार्यक्रम मुलांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नागरी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांच्या सह ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम, तांबटी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. बाळासाहेब श्रीमंतराव पाटील व अंगणवाडी तील सेविका रोहिणी रोहिदास बामणे, मदतनीस जयश्री जितेंद्र दळवी व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा लाभली.
यावेळी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या सदस्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला यामध्ये परवीन शेख, सुप्रिया देशमुख, प्रतिक्षा बापर्डेकर, अनुराधा चौरे, योगिता देशमुख, लीना जोशी, ज्योती भुजबळ आणि स्वाती डाले यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांनी सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार मानले.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home