पत्रकार किशोर साळुंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
खोपोली नगर परिषद निवडणूक : बहुजन यूथ पँथर आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार पत्रकार किशोर साळुंके यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी खोपोली नगर परिषद यांच्या कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करण्यासाठी पत्रकार साळुंके यांच्यासोबत बहुजन यूथ पँथरचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. अर्ज दाखल करण्यापूर्वी आणि नंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आपला उत्साह व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे साळुंके यांचा आत्मविश्वास अधिक वाढल्याचे दिसून आले. नगराध्यक्षपदासाठी त्यांनी केलेल्या दाव्यामुळे खोपोलीतील निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. निवडणूक प्रक्रिया वेगात सुरू असून पुढील काही दिवसांत अर्ज तपासणी, अर्ज मागे घेण्याची मुदत आणि प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home