“पेहचान प्रोजेक्ट” – आदिवासी समाजाच्या ओळखीचा प्रवास
खालापुर कर्जत / सुधीर देशमुख : टाटा स्टील फाऊंडेशन यांच्या उपक्रमा अंतर्गत व अश्वपरीस फाऊंडेशन, खोपोली यांच्या सहकार्याने “पेहचान प्रोजेक्ट” अंतर्गत निशुल्क जात प्रमाणपत्र वितरण व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ २३ सप्टेंबर २०२५ रोजी खोपोली येथे करण्यात आला असून, हा प्रकल्प खालापूर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना स्वतःची ओळख निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :
जात प्रमाणपत्राच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे.,लक्ष्यित कुटुंबांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी महसूल विभागाशी समन्वय साधणे., शासनाच्या विविध सेवा व सवलतींचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे., वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे., समान हक्क, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजात पोहोचवणे., प्रत्येक घटकाला स्वावलंबी बनवून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आणणे.
या उपक्रमात अश्वपरीस फाऊंडेशनचे कार्यकर्ते गावोगावी व वाड्यावाड्यांत जाऊन आदिवासी समाजाशी संवाद साधत आहेत व त्यांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
फाऊंडेशनचे ध्येय आहे:-
आदिवासी जात प्रमाणपत्राचे प्रमुख फायदे
1. शिक्षणातील आरक्षण:
शाळा, कॉलेज, विद्यापीठे, आणि सरकारी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण:
प्रवेश प्रक्रियेत व शुल्कात सवलत:
विशेष शिष्यवृत्ती योजना (Scholarships) व शैक्षणिक मदत:
सरकारी नोकरीत आरक्षण:
केंद्र व राज्य सरकारी नोकर्यांमध्ये ७.५% (किंवा राज्यनिहाय) आरक्षण:
स्पर्धा परीक्षांमध्ये अर्ज शुल्कात सवलत किंवा सूट:
पदोन्नतीमध्ये (promotion) काही प्रमाणात आरक्षणाची सुविधा:
गृहनिर्माण व जमीन हक्क:
आदिवासी घरकुल योजना, वनहक्क कायदा (FRA) अंतर्गत जमिनीचा मालकी हक्क.
गावठाण किंवा जंगल भागात स्थायिकतेचा कायदेशीर पुरावा म्हणून वापर.
आर्थिक व स्वयंरोजगार योजना:
लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य:
कायदेशीर संरक्षण:
सामाजिक अन्याय किंवा भेदभाव झाल्यास न्याय मिळविण्यास मदत:
राजकीय प्रतिनिधित्व:
आरोग्य व सामाजिक सुविधा:
अशा अनेक सुविधा आदिवासी बांधवाना मिळाव्यात ह्यासाठी टाटा स्टील अग्रेसर आहे.
समाजाप्रती योगदान असावे हि भावना मनात ठेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टाटा स्टील फाऊंडेशन सदस्य, अश्वपरीस संस्थापक अध्यक्ष इशिका शेलार, बनिता सहा, सुरेखा नायकर, कार्तिक इटी, सबीना,कुणाल काकडे, जावेद मालदार,परिसा शेलार,मारुती वाघमारे,दिलीप ढाके,विठोबा वाघमारे, गणेश वाघमारे यांच्या सक्रिय सहभागामुळेच “पेहचान प्रोजेक्ट” यशस्वी ठरत आहे आणि या उपक्रमाद्वारे आदिवासी समाजाला नवी ओळख, हक्क आणि सन्मान मिळत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home