Thursday, October 23, 2025

युवा नेते रुपेश सुधा सुरेश देशमुख खोनपा प्रभाग क्रमांक 10 ( सर्वसाधारण ) मधील प्रबळ दावेदार

 

खोपोली/प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांना पाहिले जाते असे युवा सैनिक रुपेश सुधा सुरेश देशमुख हे खोपोली नगरपालिका परिषद प्रभाग क्रमांक 10 चे बलाढ्य उमेदवार ठरत आहेत.हसमुख चेहरा, सर्वाना समजुन घेण्याची आकलन शक्ती आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे रुपेश देशमूख सर्व समाजात आवडते व्यक्तिमत्व असुन युवा वर्गात ते युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात.रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेले असल्याने तसेच विविध सामाजिक संस्था मधुन कार्यरत असुन प्रभावी जनसंपर्क असलेले रुपेश देशमुख यांना ऍडमिन कामाची पद्धत चांगल्या प्रकारे अवगत आहे.

कमी तेथे आम्ही या उक्तीप्रमाणे पडद्यामागे मोलाची भूमिका ते नेहमीच बजावतात त्यांच्या दिलदार स्वभावामुळे अल्पवधितच त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. आमदार महेंद्र थोरवे हे रुपेश देशमुख यांच्या चाणक्यनितीने प्रभावीत असुन पक्ष संघटन वाढविण्यात रुपेश देशमुख अग्रस्थानी असतात.

खोपोली शहरातून युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवा सेना सचिव रुपेश देशमुख यांच्या कामाचा प्रचंड व्याप पाहता प्रभाग क्रमांक 10 मधुन सर्वसाधारण प्रभागातून त्यांना शिवसेनेच्या उमेदवारीचे भावी नाही तर प्रभावी उमेदवार ठरतील तर युवा वर्गापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांच्या मनातील उमदा नगरसेवक हे रुपेश देशमुख ठरतील असा आशावाद निर्माण झाला आहे.

रुपेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर होणार या बाबीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजातील सर्च स्तर त्यांना शक्यतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील देत असुन वेळप्रसंगी विविध पक्षातील कार्यकऱ्यांनी स्वपक्ष सोडून रुपेश देशमुख यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे.

नव्या दमाच्या उमेदीने मतदारसंघातील मरगळ जाऊन मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. राजकारणात समाजकारण, अर्थकारण याची बेजोड जोड असलेले रुपेश देशमुख यांचा थक्क करणारा जीवनप्रवास त्यांना विजयाकडेच नेईल असे विजयी वातावरण मतदारसंघात पहायला मिळत आहे.

दरम्यान आमदार महेंद्र थोरवे सांगतील त्या आदेशाप्रमाणे कार्यरत असणारे रुपेश देशमुख हे सामान्य घरातील व्यक्तिमत्व इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home