Thursday, October 23, 2025

शिवाजी जाधव : लोकांमध्ये राहून काम करणारा नेता

 


पत्रकार जाधव यांचा जनसंपर्कातून प्रभाव वाढला

 यशवंतनगर परिसरातील विकासकामांत महत्त्वाची भूमिका

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील यशवंतनगर व शिळफाटा परिसराचा चेहरा पालटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी पत्रकार शिवाजी जाधव यांचे नाव गेल्या काही काळात विशेष चर्चेत आले आहे. समाजकार्य, लोकसंपर्क आणि परिसरातील प्रत्येक समस्येवर थेट काम करणारा नेता म्हणून शिवाजी जाधव यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

परिसरातील रस्ते, गटारे आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या कामांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकांपर्यंत विकास पोहोचविण्याचे काम केले आहे.

स्थानिक रहिवासी सांगतात की, शिवाजी जाधव हे आमच्यातलेच आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमात, सामाजिक उपक्रमात, अगदी लोकांच्या दुःखद प्रसंगातही हजर असतात. लोकांशी त्यांचा संवाद आणि आत्मीयता हीच त्यांची खरी ताकद आहे.

यशवंतनगर परिसरात आज अनेक विकासकामांना गती मिळाली असून, नागरिकांमध्ये “आपल्या भागातील बदलामागे शिवाजी जाधव यांचा मोठा वाटा आहे” अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, जाधव यांनी कोणतेही राजकीय पद नसतानाही परिसरातील विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहून लोकांचा विश्वास जिंकला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी जाधव हे प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि त्यांच्या प्रामाणिक कामामुळे त्यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे. “लोकांमध्ये राहून काम करणारा नेता म्हणजे शिवाजी जाधव,” असे स्थानिक नागरिक कौतुकाने म्हणतात.

परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती यासारख्या विषयांवर काम करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे यशवंतनगर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये विकासाची नवी आशा जागली आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home