आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्याकडून आशा वर्कर्सचा दिवाळी सन्मान...
आशा वर्कर च्या मानधनाचा विषय येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार .... आमदार श्री महेंद्र थोरवे
खालापुर कर्जत /सुधीर देशमुख :- कर्जत–खालापूर मतदारसंघातील आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा वर्कर्सचा दिवाळीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात, विशेषतः कोरोना काळात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्सच्या सेवाभाव आणि निष्ठेबद्दल आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी आमदार थोरवे यांनी प्रत्येक आशा वर्करला मानधन आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. “ग्रामीण भागात आरोग्य सेवेसाठी तुम्ही देवदूत आहात. कठीण परिस्थितीतही सेवाभावाने काम करणाऱ्या आशा वर्कर्समुळेच सरकारची आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली आहे
आशा वर्कर्सना केवळ अल्प मानधनावर काम करावे लागते, तरीही त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मानधनाचा मुद्दा हा सभागृहामध्ये मांडणार असल्याचे सांगितले.
“आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी या आशा वर्कर्स खांद्यावर घेत आहेत. त्यांच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे म्हणत आमदारांनी सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
आशा वर्कर्सच्या सन्मानाचा हा उपक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या संवेदनशील आणि जनहितकारी नेतृत्वाचे उदाहरण ठरला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या ‘देवदूतांना’ समाजाचा सलाम, असा सूर या कार्यक्रमात उमटला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home