कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते साप्ताहिक खालापूर वार्ता 2025 चा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न...
खालापूर/ सुधीर माने :- खालापूर कर्जत तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर आवाज उठवणारे गोरगरिबांचे हक्काचे व्यासपीठ असून सालाबाद प्रमाणे 2025 या दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते शिवतीर्थ कर्जत येथे नुकताच संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर रायगड भूषण कवी यशवंत सकपाळ, नगर पंचायत गटनेते किशोर पवार, सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ पारठे, पांडुरंग गोविंद मगर, वसंत जाधव,दिलीप जाधव, ऍड. आनंद गायकवाड, संपादक सुधीर माने, कार्यकारी संपादक संजय पाटील, सहसंपादक सीताराम पाटील,सुधीर देशमुख, सुभाष वैश्यंपायन इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक रायगड भुषण कवी यशवंत सकपाळ यांनी केले. त्यांनी खालापुर वार्ताचा कर्म अहवाल सांगुन सतत 6 व्या वर्षी दिवाळी दिवाळी अंक प्रकाशित होत आहे त्यांचे कौतुक केले त्यांनतर कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी साप्ताहिक खालापुर वार्ताच्या सामाजिक बांधिलकी व कार्याचे कौतुक हे संपादक अनेक वर्षे पत्रकारिता करीत असुन त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे असे मत व्यक्त करून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home