"शब्द निखारा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
पालघर / प्रतिनिधी :- पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातून प्रसिद्ध होणाऱ्या "शब्द निखारा" दिवाळी अंकासाठी कथा, कविता, लेख, आदी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक मंडळातर्फे करण्यात आले आहे. "शब्द निखारा" दिवाळी अंकाचे हे 16 वे वर्ष आहे.
राजकीय, सामाजिक कथा तसेच प्रासंगिक सामाजिक विषयावर सडेतोड भाष्य करणारे लेख, विविधाअंगी कविता आदी साहित्याने नटलेला "शब्द निखारा" दिवाळी अंक वाचकांसाठी जणू एक मेजवानीच असतो. या अंकात नवोदितांनाही नेहमीच संधी दिली जाते. तरी आपले साहित्य लवकरात लवकर पाठवावे असे आवाहन संपादक नरेंद्र एच. पाटील यांनी केले असून आपले साहित्य नरेंद्र एच. पाटील ( मो. 9527658570) आर्यन बिल्डिंग 404 , अनाथ आश्रमाच्या बाजूला, लागी पाडा, गोखिवरे, पोस्ट - गोखिवरे, ता. वसई, जि. - पालघर , पिन - 401208 या पत्त्यावर पाठवावे, असे कळविण्यात आले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home