जीवाची पर्वा न करता केलेलं,,,,धाडस
खालापूर/सुधीर देशमुख:- तमनाथ गावातील दोन तरुण उल्हास नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी गेले असताना पाण्याचा अनपेक्षित प्रवाह वाढल्यामुळे ते पाण्यात वाहून जात होते. या अत्यंत धोकादायक प्रसंगात प्रदीप भोईर याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निर्भयपणे उडी मारली आणि त्या दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
हे केवळ साहसाचे उदाहरण नसून समाजप्रती असलेली अपार निष्ठा, जबाबदारी आणि सेवा भावनेची उज्ज्वल झळ आहे. प्रदीप भोईर हे शिवसेना कट्टर शिवसैनिक असून आमदार श्री. महेंद्र थोरवे याचा कार्यकर्ता आहे.
या प्रसंगी बोलताना प्रदीप भोईर यांच्या या अद्वितीय कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले प्रदीप चा मला अभिमान असून तो शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे त्याने केलेली अशी निःस्वार्थ सेवा समाजात नवे प्रेरणास्थान निर्माण करत आहे , अशी भावना व्यक्त केली आहे.
.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home