पोलिस लाईन बॉईज खालापूर यांच्या वतीने सत्यनारायण महापुजेचे आयोजन
खालापूर /सुधिर देशमुख :- पोलिस लाईन बॉईज खालापूर,तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे 10 दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन व आज 4 सप्टेंबर 2025 रोजी श्री सत्यनारायण महापूजा,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कर्जत खालापूरचे माननीय आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांनी गणेश बाप्पाचे व सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले.त्यावेळी त्यांच्याबरोबर श्री डॉ.विशाल नेहुल DYSP खालापूर, श्री सचिन पवार पोलिस निरीक्षक खालापूर,श्री संतोष आवटी सहाय्यक पोलिस निरीक्षक खालापूर व त्यांच्याबरोबर त्यावेळी खालापूरचे पोलिस अधिकारी व अंमलदार ह्यावेळी उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home