Wednesday, September 3, 2025

खालापूर सह वणवे गावांत पांच दिवसीय गौरी गणपतींना भक्तीमय वातावरणात निरोप

 


गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला'च्या जय घोषात लाडक्या बाप्पाला निरोप 

खालापूर/ प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्रात गौरी गणपती उत्सव अत्यंत दिमाखात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. खालापूर सह वणवे गावात देखील गणपती उत्सव व गौरी पूजन हा कार्यक्रम ग्रामीण भागात अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी गणपतीचा अभिषेक येताच पूजन करून आरती केली जाते, त्यानंतर संध्याकाळी आरती, भजन आदी कार्यक्रम नियमित चालतात. यावर्षी प्रथम दोन दिवसांच्या खाड्यानंतर गौराईचे आगमन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व महिला गौराईची ओवाळणी करतात. नवीन सुनांना ववसा दिला जातो व त्यानंतर गौराईच गीत गाऊन सर्वजण येताच पूजा करतात व प्रार्थना करतात.

सर्व कुटुंबाला यश, कीर्ती, आयु , आरोग्य अखंड सौभाग्याचे लेणे मागतात. रात्री गौराईची आरती वगैरे झाल्यावर महिला गौराईचे गीत गाऊन काटवट काना खेळतात अशा प्रकारे भक्तीमय वातावरणात गौरी गणपतीचे यथासांग पूजन सात दिवस करून त्यांना भावपूर्ण निरोप दिला जातो. यावेळी गावातील सर्व तरुण, महिला, युवक, बालगोपाल सर्व मिळून गावातील एकूण 23 ते 24 गणपती व सात गौराईच्या विसर्जनासाठी भक्तिमय वातावरणात व फटाक्याच्या आतीषबाजी नदीपर्यंत केले जाते. यामध्ये भैरवनाथ मंदिरात एक आरती व त्यानंतर दत्त मंदिरात ही पूजन केले जाते. नदीकाठच्या गणेश घाटावर यथासांग आरती करून सर्व ग्रामस्थ, महिला या गणपती बाप्पा व गौराईला निरोप देण्याकरीता एकत्रित येत असतात. वणवे गाव हे धार्मिक असून येथे कोणत्याही प्रकारचे जुगार वगैरे न खेळता ही तरुणाई, महिला भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देत असतात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home