राकेशजी गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी संघात प्रवेश करत आहे............. लोकसेवक अशोक वाघमारे
खालापूर /सुधीर देशमुख :- डोनवत येथे आयोजित बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराला सहज भेट देण्यासाठी आलेल्या लोकसेवक अशोक वाघमारे यांनी अखिल भारतीय बौद्ध महासंघात जाहीर प्रवेश केला. मी आज पर्यंत संघातच होतो. परंतु काही लोकांनी माझी दिशाभूल करून मला संघा पासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आज आदरणीय राकेश जी गायकवाड व दीपक गायकवाड यांचे धम्म कार्य पाहून मी आजन्म संघाची सेवा करणार आहे. असे आयुष्यमान अशोक जी वाघमारे यांनी शेकडो उपासक उपासिका यांचे समोर जाहीर केले.. अशोक वाघमारे हे छत्तीशी विभागातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असून लहानांपासून थोरांपर्यंत सुपरीचीत आहेत. त्यांच्या प्रवेशाने संघाला एक लोकप्रिय कार्यकर्ता मिळाला असून लवकरच ते आपल्या कार्याला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे संघात चैतन्य निर्माण झाले आहे. असे सुतोवाच संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक जी खाडे सर यांनी केले आहे. तसेच अशोक वाघमारे यांचेवर खालापूर तालुका उपाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी श्री. खाडे सर यांनी दिली आहे. तसे पत्र त्यांना देण्यात आले .
यावेळी आयु. दिलीप जी मोरे, अनंत शिंदे ,ज्योतीताई खाडे, दत्ताजी जाधव, चंद्रकांत साळवे आप्पा, ज्ञानेश्वर धनवे ,रमेशजी डोंगरे,गोविंद कांबळे, रुपेश निकाळजे, पुरुषोत्तम मोरे, सुरेश डोंगरे, दीपक गायकवाड,सुनिल सोनावणे, जगदीश कांबळे व शेकडो उपासक उपासिका उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home