Thursday, September 11, 2025

साखर चौथ गणपती विसर्जन उत्सव साजरा


 खालापुर/सुधीर देशमुख:-महाराष्ट्रात आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. त्याच प्रमाणे 11/09/2025 रोजी खालापूर तालुक्यातील साखर चौथ गणपती विसर्जन वाजत गाजत आनंदात कुठेही अनुचित प्रकार न घडता अत्यंत उत्साहात तालुक्यात विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. 

सावरोली गावाचा राजा भैरवनाथ मंदिर सावरोली साखर चौथ गणपती 3 रे वर्ष हे माननीय सावरोली ग्रामपंचायतचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत व सावरोली गावाचे ग्रामस्थ,तरुण वर्ग,महिला मंडळ व लहान बालगोपाल यांच्या उपस्थितीत उस्फूर्त व आनंदात वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home