Wednesday, September 10, 2025

महाड येथील RPI वर्धापन दिनासाठी कर्जत-खालापूर पदाधिकाऱ्यांचा निर्धार

 


खालापूर / सुधीर देशमुख:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डिकसळ-शांतीनगर (कर्जत-कल्याण रोड) येथे पार पडली. या बैठकीचे आयोजन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आयु. किशोर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

       या बैठकीस रायगड जिल्हाध्यक्ष मा. नरेंद्रभाई गायकवाड, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष मा. राहुलजी डाळिंबकर व कोकण प्रदेश संघटक मारुतीदादा गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा सचिव सुनील सोनावणे, खालापूर तालुका अध्यक्ष सुर्यकांत कांबळे, प्रभारी कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किशोर गायकवाड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत ३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारीसह तालुकास्तर व जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवर नावे सुचविणे, तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी गोपीनाथ सोनावणे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाच्या महाड येथील मुख्य कार्यक्रमास बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत तन, मन आणि धनाने योगदान देण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी मार्गदर्शन करताना कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच वर्धापन दिन भव्यदिव्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देखील दिल्या. यावेळी या बैठकीला कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, मारुती दादा गायकवाड कोकण प्रदेश संघटक, ॲड उत्तम गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, कर्जत तालुकाध्यक्ष मनोज गायकवाड, कर्जत विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत कांबळे, कर्जत युवक अध्यक्ष अमर जाधव, महिला अध्यक्षा सुरेखाताई कांबळे, जिल्हा सचिव सुनिल सोनावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home