Wednesday, September 10, 2025

जांभिवलीत भारतीय बौद्ध महासभेकडून वर्षावास मालिकेचे अकरावे पुष्प गुंफले

 

बौद्धांचे मंगल सण व मंगल दिन’ या विषयावर राजेंद्र क्षीरसागर यांचे प्रबोधनकारी प्रवचन

खालापूर / सुधीर देशमुख:– दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा खालापूर यांच्या अंतर्गत ग्रामशाखा जांभिवलीत धम्म संस्थेच्या माध्यमातून वर्षावास मालिकेचा अकरावा पुष्प रविवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५) जांभिवली बुद्ध विहार येथे संपन्न झाला. दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत झालेल्या या प्रवचन कार्यक्रमात धम्म उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           या प्रसंगी ‘बौद्धांचे सण मंगल दिन’ या विषयावर जिल्हा महासचिव राजेंद्र क्षीरसागर यांनी प्रबोधनपर माहिती दिली. त्यांनी आपल्या विचारांतून बौद्ध धम्मातील मंगल सणांचे महत्त्व, सामाजिक बंधुभावाची जपणूक आणि धम्ममार्गाने जगण्याचे मोल यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी प्रवचनामुळे उपस्थित धम्मबांधव मंत्रमुग्ध झालेले पहायला मिळाले. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन केदारे, ज्येष्ठ बौद्धाचार्य दत्तात्रेय ओव्हाळ, रायगड जिल्हा नियोजन सचिव गणेश केदारी, खालापूर तालुका अध्यक्ष विनायक गायकवाड, खानापूर तालुका महासचिव राजेश क्षीरसागर, खालापूर तालुका कोषाध्यक्ष रमेश मोरे, संस्कार उपाध्यक्ष भानुदास गायकवाड, संस्कार सचिव गणेश शिर्के, संरक्षण उपाध्यक्ष योगेश गायकवाड, छत्तीशी विभागीय अध्यक्ष संदीप गायकवाड, ज्येष्ठ धम्म उपासक विलास गायकवाड, श्रावण गायकवाड, गणेश मोरे, ग्रामपंचायत सदस्या आशा मोरे, विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण यादव, शैलेश वाघमारे, भाऊ राम सोनवणे, रवी सताने यांच्यासह छत्तीशी विभागातील धम्म उपासक-उपासिका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home