Friday, November 7, 2025

स्वतंत्र कोकणराज्य अभियानचा "कोकणरत्न" पदवी पुरस्कार विकास बिरवाडकर यांना जाहीर

 


खालापुर कर्जत/प्रतिनिधी :-गेली अनेक वर्षे सामाजिक, वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थीपणे उल्लेखनीय योगदान देत असलेले समाजसेवक,रायगड मराठी प्रतिष्ठान प्रमुख संघटक श्री.विकास महादेव बिरवाडकर यांनी खडतर मेहनत घेऊन अल्पावधीतच विविध क्षेत्रात कौतुकास्पद छाप पाडली असुन, जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान मिळवले आहे. विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असुन, त्यांची कार्यतत्परता तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्न यामुळे लोकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. कोणताही रुग्ण असो त्याला हॉस्पिटलची गरज लागली किँवा हॉस्पिटलचे बिल माफ करण्याचे किंवा कमी करण्याचे असो समाजसेवक विकास बिरवाडकर नेहमीच तत्पर असतात निस्वार्थीपणे कार्य करून कोणताही भेदभाव न करता अनेकाना त्यांनी आपुलकीने मदत केली आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि) याचे प्रमुख संघटक यांनी विरार नालासोपारा वसई, हा विभाग संघटित केला असून विरार माणगाव लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायेत मुंबई व रायगड मध्ये कार्यरत असणारे विकास पार्वती महादेव बिरवाडकर गाव :घूमेश्वर. तालुका- म्हसळा जिल्हा- रायगड येथील मुळगावचे असून मुंबई मध्ये विरार येथे वास्तव्यास आहेत. 


अत्यंत मितभाषी असणारे व्यक्तिमत्व आपला जन्मच समाजसेवासाठी झालाय असे त्यांचे नेहमीच म्हणणे असते. त्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात . त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे त्यांना सन्मानाचा "कोकणरत्न" पुरस्कार जाहीर केला सदर पुरस्कार 13 डिसेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन दुसरा मजला येथे भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांचे आभार मानले. विकास बिरवाडकर यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home