Sunday, November 2, 2025

भाजप खोपोली शहर अध्यक्षपदी अजय इंगूळकर

 


खोपोली / मानसी कांबळे :- भारतीय जनता पक्ष खोपोली मंडळाच्या अध्यक्षपदावर अजय इंगूळकर यांची वर्णी लागली असून जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी ही जबाबदारी सोपविली आहे. पूर्वीच्या अध्यक्षांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी होती.


निवडणुकीचा काळ असल्याने या पदावर माजी खोपोली सरचिटणीस अजय इंगूळकर यांच्या नावावर खोपोली मंडळात पदाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर जिल्हाध्यक्ष (उत्तर रायगड) अविनाश कोळी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, नितीन पाटील व खोपोली संपर्क प्रमुख सुनील घरत इच्छुकांच्या मुलाखती संदर्भात महाराजा मंगल कार्यालयाच्या बँक हॉल येथे आले होते.


त्यावेळी अविनाश कोळी यांनी अजय इंगूळकर यांची खोपोली मंडळ अध्यक्षपदी नेमणूक केल्याची घोषणा केली. यावेळी खोपोली निवडणूक यंत्रणा प्रमुख यशवंत साबळे, विधानसभा मतदारसंघ समन्वयक हेमंत नांदे, माजी शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, रमेश रेटरेकर, खोपोली महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी अत्रे, युवा नेते व नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार विक्रम साबळे यासह खोपोली भाजप मंडळाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home