Sunday, November 2, 2025

आमदार महेश बालदी यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर, अनेकांनी घेतला लाभ

 


चौक/प्रतिनिधी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या वतीने आणि डॉ. हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या सयुक्त विद्यमाने व ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या सौजन्याने नानिवली चौक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.


 शिबिराचे उद्घाटन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उप सरपंच सौ.पूजा जगदीश हातमोडे, सदस्य सुभाष पवार,नैना झिंगे,डाॅ मृण्मयी वैदय,अनुष्का मालवनकर,शिबिर संयोजक विनोद पाचघरे,सिमा बेलोसर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट.पनवेल यांचे सहकारी उपस्थित होते.

ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी आपल्या हद्दीतील दुर्गम भागातील नाणिवली येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते.सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.ज्या रुग्णांना मोतीबिंदू व अन्य डोळ्यांच्या शस्त्रक्रियाची गरज होती, त्यांना नेण्या आनण्याची, राहण्याची,खाण्याची व शस्त्रक्रिया खर्च लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट व आमदार महेश बालदी यांच्याकडून करण्यात येणार आहे.यावेळी ज्यांना आवश्यक होते त्यांना चष्मे देण्यात देण्यात आले. 

यावेळी ८३ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली,तर १२ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे, ग्राम पंचायत सदस्य आणि ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यासह नानिवली ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home