श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान कडुन पुन्हा एकदा ऐतिहासिक बारवची साफसफाई व स्वच्छता
खालापुर कर्जत/प्रतिनिधी :- श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान हे गेली कित्येक वर्षापासून गडकोटांवर स्वच्छता, गडकोटांचे संवर्धन, ऐतिहासिक मंदिरे, ऐतिहासिक बारव, विरगळी, सातीशीला हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे जपण्याचे कार्य करत आहेत. एकविरादेवी, आळे फाटा रेडा समाधी, साजगाव, कराडे, मोहोपाडा अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी गडदुर्ग,बारव, भुईकोट यांची डागडुजी साफसफाई केली असून, नुकताच श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान यांनी वनवठे येथील ऐतिहासिक बारवची नागझिरी ह्या नावाने ही बारव प्रसिद्ध आहे अश्या बारवची म्हणजेच विहिरींची साफसफाई, स्वच्छता केली. गावातील वडिलोपार्जित वर्षानुवर्ष असलेल्या विहिरी त्या नादुरुस्त अवस्थेत होत्या त्या चिखलाने भरलेल्या होत्या. त्या विहिरींची पाहणी करून त्यांची सुव्यवस्थितपणे करून स्वच्छ करण्यात आल्या.
पूर्वीच्या व्यापार करणाऱ्या लोकांना पाणी पिण्यासाठी या विहिरीचे बांधकाम करण्यात आले असावे, तसेच पूर्वी उन्हाळ्याच्या काळात आजूबाजूची सात ते आठ गावे या विहीरीतील पाण्याचा उपयोग करत होते असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचा फायदा पुढच्या पिढीपर्यंत कायम टिकून ठेवणे याची माहिती नवीन पिढीला अवगत व्हावी म्हणून प्रतिष्ठानने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
या प्रतिष्ठानमध्ये दोनशेहून अधिक महिला, पुरुष कार्यरत असून सर्व नोकरदार वर्ग आहे, आठवड्यातील एक सुट्टीच वार कुठेही खर्च न करता समाजासाठी, स्वच्छता मोहिमेसाठी खर्च करत असतात आणि महत्वाचे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने जात असतात. या मोहिमेत ३५-४० हुन अधिक प्रतिष्ठानचे सभासद सहभागी झाले होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home