निवडणुकांचे बिगुल वाजले!
नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर ; 2 डिसेंबरला मतदान
3 डिसेंबर ला निकाल
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायती निवडणुकांसाठी अखेर बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे अनिवार्य असून, त्यानुसार नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे.
* निवडणूक कार्यक्रम जाहीर :- उमेदवारी अर्ज दाखल 10 नोव्हेंबर 2025 पासून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर, अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर, माघार घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर 2025, मतमोजणी 3 डिसेंबर 2025 आणि निकाल 10 डिसेंबर.
246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामधून 6859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषदांचा समावेश आहे. 15 नवीन नगर पंचायत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
147 नगरपंचायती आहेत, त्यातील 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. 27 नगर पंचायतींची मुदत संपलेली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. 13 हजार 355 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. ईव्हीएमने निवडणुका होणार आहेत. तसेच जात वैध प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्याचा अवधी असेल. मतदारांना मोबाईल अँपद्वारे मतदान केंद्र, यादीतील नाव, उमेदवारांची माहिती मिळेल. उमेदवारांविषयीची माहिती ही अँपच्या माध्यमातून मिळणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
* दुबार मतदारांवर कारवाईचा नवा नियम :- दुबार नाव असलेल्यांवर संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेण्यात आली आहे. टुलद्वारे याचा शोध घेऊन संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आले आहे. दुबार मतदारासमोर डबल स्टार आले आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतले जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केले नाही असे लिहून घेतले जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असे त्याच्याकडून लिहून घेतले जाईल असे राज्य निवडणूक आयोगने सांगितले आहे. दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे, असे राज्य निवडूक आयोगाने म्हटले आहे.
* निवडणूक साखळीला गती :- या घोषणेनंतर राज्यातील सर्वच पक्षांच्या रणनीतींना वेग आला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने आगामी आठवडे अत्यंत तापदायक आणि राजकीयदृष्ट्या गतीमान असणार हे निश्चित.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home