बडुर गणातील भाजपचे इच्छुक उमेदवारांचे गावोगावी भेटीगाठी
देगलूर/ प्रतिनिधी :- बिलोली - सद्या चालू असलेल्या राज्यातील पंचायत समिती च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बिलोली तालुक्यातील पंचायत समिती बडुर गणातून अनुसूचित जाती साठी जागा राखीव असून या साठी इच्छुक असणारे भाजपा झोपडपट्टी सेल चे जिल्हा संयोजक तसेच हिप्परगा थडी माजी सरपंच प्रतिनिधी श्री साहेबराव अंजनीकर यांनी बडुर गणातील गावोगावी जाऊन आज भेटी घेत आहेत. अंजनिकर हे वीस ते पंचवीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केले.अभ्यासू, विश्वासू आणि अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारे हिप्परगा थडी येथील तडफदार माजी सरपंच प्रतिनिधी तसेच देगलूर बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार जितेशजी अंतापूरकर साहेब आणि लक्ष्मणजी ठकरवाड साहेब यांचे खांदे समर्थक तसेच नांदेड जिल्ह्याचे राज्यसभा खासदार अजितजी गोपछडे साहेब यांचे कट्टर समर्थक जर साहेबांनी आदेश दिला तर यावेळेस बडुर सर्कल पंचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले आणि हिप्परगा थडी येथे सरपंच या पदावर असता वेळेस अंदाजे जवळपास दोन कोटी रुपयांचे कामे करून दलित वस्ती अल्पसंख्यांक विभागातील रस्त्याचे व तसेच पाण्याचे प्रश्न मिटविले पतदिवे पण बसविण्यात आले.
त्याच कामाचा अनुभव घेऊन बडुर सर्कलचा विकास करता येईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या भागातील विकास कसे करता येईल याकडे पूर्ण लक्ष देऊन समाजकार्य करणारे समाजातील प्रश्न तसेच युवा वर्ग, शेतकरी बांधव यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करतील अशी आशा बाळगणारे या भागातील नागरिक अंजनिकर साहेबराव यांच्यावर विश्वास दाखवून आमच्या हक्काचा उमेदवार मिळाल्यास आमची अडचण वेळीच मिटेल. असे आज बडुर गणातील गंजगाव, माचनूर, लघुळ, कार्ला या गावात अंजनिकर यांनी भेटीस गेल्या दरम्यान आपले विचार मांडत होते. गावातील लोकांकडून देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून आपण केलेल्या आजपर्यंत पक्षाच्या पक्ष वाढीसाठी तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये धावपळ करून मिळवून दिलेले यशाबद्दल नक्कीच पक्षाने आपले विचार करून ही संधी तुम्हाला देईलच आणि नागरीकांनी देखील पक्षश्रेष्ठीकडे आम्ही पण तुम्हास उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करू असे म्हटले आहे.प्रत्येक गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home