खालापूर तालुक्यातील जांबरुंग गावचे सुपुत्र सुधाकर बुवा पाटील मराठी साहित्य मंडळाकडून समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने केले सन्मानित ....
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील जांबरुंग गावचे सुपुत्र सुधाकर बुवा देऊ पाटील हे लहानपणापासून विविध क्षेत्रात आपल्या सुप्त कलागुणांच्या आवडीने त्यांनी स्थानिक पातळीवर खालापूर कर्जत सारख्या तालुक्यात कलीच्या नारद सारख्या भूमिकेतून आपले सुप्त कलागुण दाखवून दिले होते त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून नारद मुनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे व त्यांच्या वेशभूषा करून विविध भूमिका सादर केल्या. त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमातून पुरस्काराने सन्मानित केले आहेत त्यांनी या कार्यातून समाजप्रबोधन व समाज जागृती करून व आपल्या सुश्राव्य भारुड रूपातून व गायनातून त्यांनी विविध गाणी स्वतः लिहून स्वतः गाऊन दाखविली आहेत.
त्यामुळे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे व सांस्कृतिक कार्यक्रमातून झालेले समाज प्रबोधन पाहून त्यांना नुकताच ठाणे येथे आमदार संजय केलकर यांच्या हस्ते सुधाकर बुवा पाटील यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी या वेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर कवयित्री लीना वाघमारे निवेदिका रेखा काळे व असंख्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या पुरस्काराने सुधाकर बुवा यांच्यावर कर्जत खालापूर तालुक्यातून व संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home