बालाजी महाराजांच्या भक्तिरसात नगरदेवळा रंगले!
वैकुंठ चतुर्दशीनिमित्त नगरदेवळा येथे बालाजी रथोत्सवाची भक्तिमय मिरवणूक
* पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त, भाविकांची मोठी गर्दी...परंपरा, भक्ती आणि उत्साहाचा संगम
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळ्यात शतकोपूर्व परंपरेनुसार साजरा होणारा ऐतिहासिक रथोत्सव वैकुंठ चतुर्दशीनिमित्त मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळपासूनच गावात सणासुदीचे वातावरण आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
संध्याकाळी 5 वाजता बालाजी महाराज व रथाची पूजा करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिक्षाताई काटकर, किरण काटकर सर, माजी सभापती अंजलीताई नाईक, माजी जि. प. सदस्य रावसाहेब (जिभाऊ) पाटील, भाजप नेते रविंद्र पुंडलिक पाटील (रवि बाबा), प्रणय (मुन्ना) भांडारकर, जेष्ठ नेते अविनाश कुडे, माजी उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच सागर पाटील, विलास राजाराम भामरे, माजी सरपंच नामदेव भावडू, संजय महाजन, शेतकरी नेते नामदेव नाना महाजन, भाजप नेते शुभम शिंपी, श्याम सर इसाई, विनोद परदेशी, मिलींद दुसाने, मुन्ना काका परदेशी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार, गावातील व परिसरातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संध्याकाळी 5.30 वाजता बालाजी मंदिरातून निघालेल्या रथौत्सव मिरवणुकीत बॅन्ड पथक, आधुनिक नृत्य कलाकारांचे नृत्य आणि पारंपरिक वाद्यांचा गजर अशा दिमाखात सुरु झाली. मुख्य रस्त्यावरील विविध ठिकाणी महिला वर्ग व नागरिकांनी बालाजी महाराजांची व रथाची पूजा करून स्वागत केले. मिरवणूक पोलिस स्टेशनपर्यंत नेऊन रात्री पुन्हा मंदिर परिसरात आणण्यात आली. रात्री 10 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात रथ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, भाजप नेते अमोल शिंदे, शिवसेना युवा नेते सुमित किशोर पाटील यांनी भेट देत बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
जळगांव पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक (चाळीसगांव) कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी अरूण आव्हाड व पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गनगे व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. विशेष पोलिस दलाला देखील पाचारण करण्यात आले होते, त्यांनी देखील कायदा व सुव्यवस्थेची निगा राखली. कोणताही अनुचित प्रकार न होता रथौत्सव यशस्वीपणे पार पडला.
यात्रेत खेळणी, कपडे, कटलरी, शेव-मुरमुरे-जिलेबी, बालकांसाठी पाळणे व झोके अशा विविध दुकानांची रेलचेल होती. भाविकांनी याचा मनसोक्त आनंद घेतला. शेवटी पोलिस प्रशासन, पत्रकार, रथोत्सव समिती सदस्य, सरपंच व प्रतिष्ठित पाहुण्यांचा रुमाल, नारळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
आज व उद्या विशेष कार्यक्रम :- 5 नोव्हेंबर 2025, बुधवार रोजी रात्री वहनाचा (वहन उत्सव) भव्य कार्यक्रम होणार आहे. 6 नोव्हेंबर 2025, गुरूवार रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत कुस्त्यांचे सामने होणार आहेत. भाविक व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रथोत्सव समिती व बालाजी महाराज संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home