Saturday, November 1, 2025

बिलोली - पक्षाने संधी दिल्यास बडूर गणातून निवडणूक लढवणार - साहेबराव अंजनिकर

 


नांदेड / प्रतिनिधी : - बिलोली - राज्यात सद्या चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू नांदेड जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजले असून बिलोली तालुक्यातील पंचायत समिती बडूर गणातून निवडणुकीची तयारी पण सुरू झाली असून या गणातून हिप्परगा थडी येथील माजी सरपंच प्रतिनिधी तसेच भाजपा झोपडपट्टी सेलचे नांदेड जिल्हा संयोजक श्री साहेबराव अंजनीकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करणारे राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब व बिलोली आणि देगलूर विधानसभेचे आमदार जितेशजी अंतापूरकर साहेबांनी आदेश दिल्यास आपली उमेदवारी निश्चित असल्याचे अंजनिकर यांनी स्पष्ट केले. बऱ्याच वर्षांपासून ते झोपडपट्टी सेल चे जिल्हाध्यक्ष मनून पक्षाची जीमेदारी खांद्यावर घेऊन एकनिष्ठपणे कामगिरी करून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविले तसेच कुठल्याही शासकीय कार्यालयात काम पडल्यास ते कुठल्याही पक्षाचा जातीचा, धर्माचा, वेळेचा विचार न करता तत्पर उपस्थित राहून ते प्रश्न सोडवतात. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांची बिलोली तालुक्यात चांगलीच पकड निर्माण आहे तसेच त्यांच्या मागे युवा वर्ग देखील भक्कम उभा आहे.ते कनिष्ठ स्तरावरून पक्षाशी निष्ठा राखत कार्य करणारे खरे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्याची ओळख ही तालुक्यातील एक सक्रिय कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळणार कार्यकर्ता म्हणून आहे.


तालुक्यातील भाजपा पक्षाचे अनेक नेते इतर पक्षात गेले असतानाही साहेबराव अंजनीकर यांनी भाजपा पक्षाची निष्ठा कायम राखत लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाचा उमेदवार प्रथम क्रमांकावर ठेवण्यात त्याचा मोठा वाटा आहे.


अंजनिकर हे नांदेड जिल्ह्याचे लोकनेते राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब व खासदार डॉ. गोपछडे साहेब आणि बिलोली - देगलूर विधानसभेचे आमदार जितेश जी अंतापुरकर तसेच या भागाचे ठक्करवाड साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू खंदे समर्थक मानले जातात. माझं ध्येय राजकारण नव्हें तर भाजपा विचाराची सेवा आहे.पक्षश्वेष्टीने संधी दिल्यास बडूर गणातून निवडणूक नक्की लढवणार आहे.असे भाजपा झोपडपट्टी सेलचे जिल्हा संयोजक अंजनीकर साहेबराव यांनी ठामपणे सांगितले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home