देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी युवकांना संधी मिळाली पाहिजे - सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर
नांदेड /जावेद अहमद :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी युवकांना सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक कार्याच्या अनुषंगाने जे युवक अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ते लोकांच्या अडीअडीचणी सोडवितात सदैव सामाजिक कार्यात तत्पर असतात.
अनुभवी युवकांना सर्वच राजकीय पक्षांनी संधी द्यावी असे प्रतिपादन देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी केले आहे. हल्ली उठ सूट कोणीही युवक आपल्याला पक्षाकडून तिकीट भेटावं यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनुभवी युवांना जर राजकीय पक्षांनी संधी दिली तर शहराचा विकास होईल. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी सांगितले.
.jpg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home