पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेसाठी ऐतिहासिक विजय नोंदविन्यास सज्ज...
संदीप राम पाटील हे खोनपा प्रभाग क्रमांक 1 मधील
( सर्वसाधारण ) नंबर 1 चा ठरणार विजयी उमेदवार :
खोपोली/प्रतिनिधी :- तरुणांच्या गळ्यातील ताईत संदीप राम पाटील हे खोपोली नगरपालिका परिषद प्रभाग क्रमांक 1 चे नंबर 1 चे उमेदवार ठरत आहेत.हक्काने मदतीला येणारा त्यांचा स्वभाव व जोडलेला प्रचंड जनसंपर्क हा त्यांच्या जमेची बाजू आहे. सुभाषनगर, जगदीशनगर,लौजी, वासरंग येथील मोठा जनसमुदाय सोबत असुन शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये कुलदीपक शेंडे, दिलीप जाधव यांच्या सोबतीने त्यांचा शेकडो समर्थकासह झालेला प्रवेश हा लक्षनीय आहे.आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात पडद्याआडून योगदान देणाऱ्या चेहऱ्यात संदीप पाटील यांचे नाव अग्रणी आहे.अजातशत्रू असलेले संदीप पाटील यांच्या रूपाने विकासाचा चेहरा स्थानिक जनतेला मिळणार असुन एव्हाना त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्याची चर्चा मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
अचूक निर्णयक्षमता व सर्वाना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची तत्परता खोपोली नगरपालिका निवडणुकीत 2025 मधील पहिले सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार ठरून ऐतिहासिक चेहरा ठरतील या उत्साहाने खोपोली परिसरातील समर्थक व पक्षीय नेते कामास लागलेले आहेत.
तरुण उत्साही नेतृत्व संदीप राम पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणून गुलाल आपलाच हा नारा घेऊन युवा, महिला व ज्येष्ठ जीवाचे रान करताना दिसत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home