Monday, November 10, 2025

रंग निळा नाद खुळा” - कौटुंबिक धम्माल विनोदी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या

 


प्रतीक्षा आर्ट इंटरनॅशनल आणि के.बी.एस.एस. ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हास्याचा महाउत्सव

नाशिक / फिरोज पिंजारी :- मनोरंजनाच्या विश्वात नव्या धमाक्याची चाहूल लागली आहे. प्रतीक्षा आर्ट इंटरनॅशनल आणि के. बी. एस. एस. ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेक्षकांसाठी एक भन्नाट कौटुंबिक विनोदी वेबसिरीज “रंग निळा नाद खुळा” लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम गायकवाड असून त्यांनी आपल्या सर्जनशीलतेतून एक विनोदी पण वास्तवाशी जवळचे कथानक विणले आहे. ही मालिका केवळ हसवणार नाही तर प्रत्येक कुटुंबाला काही ना काही संदेश देऊन जाईल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रमिला चव्हाण आणि अभिनेता दीपक निकम यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपक निकम हे या मालिकेचे निर्माते म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच बालकलाकार श्री सूळ यांची उपस्थिती मालिकेत एक वेगळीच रंगत आणणार आहे.

कलात्मक मांडणीसाठी कला दिग्दर्शक भारती चित्ते यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, तर कार्यकारी निर्माती मंदा पवार यांनी संपूर्ण निर्मिती प्रक्रियेला सक्षमपणे हाताळले आहे. या मालिकेत सुभाष बोराडे, मोहन सौदागर, अण्णा हिंगमिरे, सुनंदा मांडगे यांसह नाशिक, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील अनेक नामवंत कलाकार झळकणार आहेत.

छायाचित्रणाची जबाबदारी अरुण मोहोळ यांनी सांभाळली असून, त्यांच्या अनुभवामुळे मालिकेला सुंदर दृश्यात्मक रूप मिळाले आहे. तसेच विशेष सहाय्यक म्हणून बांबू हॉटेलचे मालक आणि पदाधिकारी यांचेही सहकार्य लाभले आहे.

“रंग निळा नाद खुळा” ही वेबसिरीज प्रेक्षकांना हसवतानाच सामाजिक संदेशही देईल, असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. लवकरच ही वेबसिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, मनोरंजनाच्या दुनियेत नवा रंग आणि नवा नाद निर्माण करेल, असा विश्वास लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home