रामदास पाटील सुमठाणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आगामी निवडणुकांसाठी नांदेड जिल्हा पक्ष संघटनेत उत्साह
देगलूर/ प्रतिनिधी :- नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे. यावेळी हर्षवर्धन सकपाळ म्हणाले कि, हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देगलूरमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते असलेले अविनाश नीलमवार, माजी उपनगर अध्यक्ष बालाजी रोयलावार असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा यशपाल भिंगे, अब्दुल सत्तार,देगलूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी नगरअध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, तालुका अध्यक्षा श्वेताताई बस्वराज पाटील, कैलास येसगे,मीरा मोहियोदिन, हाफिज खान पठाण, संतोष उंनग्रतवार, युवक अध्यक्ष इलीयास बागवान, आदी मान्यवर उपस्थित होते.
.jpg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home