Tuesday, October 14, 2025

भाग्य आमच आदिवासी क्रांतिवीर नाग्या कातकरी व बिरसा मुंडा यांच्या वंशजांना विजयी करण्यासाठी हातभार लागणार=सुधीर ठोंबरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

 

खालापूर/ दिपक जगताप :- चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी पडलेले अनुसूचित जमाती आरक्षण आदिवासी समाजासाठी विकासाचा नवीन टप्पा गाठणारा आणि नवी दिशा देणारा असेल असे मत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी व्यक्त केले .परंतु आरक्षणात जिल्हा परिषद गटातील जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे. तरीही नाराज न होता सुधीर ठोंबरे व मोतीराम ठोंबरे हे दोघे बंधू आदिवासी समाजासाठी नेहमीच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात.80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणाऱ्या ठोंबरे बंधूनी खेडोपाडी वाडी वस्तीवर विकास कामातून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण केला आहे त्यामुळे जरी आरक्षण अनुसूचित जमातीसाठी पडले असले तरी हा देवाचा कौल समजून ठोंबरे बंधू झपाट्याने कामाला लागले आहेत .

आदिवासी बांधवांच्या सुखदुःखात कायम सहभागी असणारे सुधीर ठोंबरे ,मोतीराम ठोंबरे आणि त्यांची पुढची पिढी चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे या भागात विकास कामामुळे ओळखले जातात. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे जे उमेदवार असतील त्यांना आपले समजून निवडून आणणार असून आदिवासी क्रांतिवीर नाग्या कातकरी व बिरसा मुंडा यांच्या वंशजांना विजयी करण्यासाठी हातभार लागणार असल्याचे सुधीर शेठ ठोंबरे यांनी सांगितले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home