Monday, October 13, 2025

मी सज्ज आहे नगरदेवळा पंचायत समिती गणात विकासाची गंगा आणायला!

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या युवती नेत्या अभिलाषा भिला रोकडे यांचा निर्धार

 पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग

राष्ट्रवादी युवती आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा अभिलाषा रोकडे या आघाडीवर!

नगरदेवळा पंचायत समिती निवडणूक : महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावातील चौकाचौकात, चहा टपरी, बाजारात चर्चेला सुरुवात झाली असून इच्छुकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या युवती आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे या नावाने आघाडी घेतली आहे.

 महिलांच्या नेतृत्वाला बळ देणारा चेहरा :- अभिलाषा रोकडे या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आणि ग्रामीण विकासाच्या अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग आहे. त्या म्हणतात, मी सज्ज आहे नगरदेवळा पंचायत समिती गणात विकासाची गंगा आणायला. या, मला साथ द्या...गावाचा, मतदारसंघाचा विकास साधू या...उमेदवार मी नव्हे, तुम्ही सर्व आहात. आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येऊ या.

त्यांचा हा संवाद केवळ निवडणुकीचा संदेश नाही, तर जनतेच्या सहभागातून विकास साधण्याचा ध्यास आहे.

 विकासाचा ठोस आराखडा - “गाव बदलायचं, मनोवृत्ती बदलायची अभिलाषा रोकडे यांनी मतदारसंघासाठी संपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. त्यात शेतीतील आधुनिकता, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, ग्रामविकासात पारदर्शकता, तसेच शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या उन्नतीवर त्यांचा विशेष भर आहे.

त्यांचा संदेश स्पष्ट आहे की, गाव बदलायचं असेल, तर मनोवृत्ती बदलावी लागेल. माझा प्रयत्न विकासाची दिशा देण्याचा असेल.

 तरुणाईची साथ, जनतेचा विश्वास :- अभिलाषा रोकडे या तरुण नेत्या असून युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी ‘विकास पथक’ उभारून प्रचाराची तयारी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर महिलांचा आणि शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असल्याची चर्चा आहे.

आपल्या मुलीच्या पाठीशी उभे रहा :- अभिलाषा रोकडे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी आपल्या मुलीच्या पाठीशी उभे रहा. मी फक्त एक चेहरा आहे, पण हा लढा प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे.

त्यांचा हा संदेश स्त्रीशक्तीचा आणि लोकशाही सहभागाचा सुंदर संगम ठरतो आहे.

राजकीय हालचालींना वेग - राष्ट्रवादी पक्षात उत्साह, विरोधकांत हालचाल :- नगरदेवळा गणाच्या आरक्षणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. अभिलाषा रोकडे यांचे नाव पुढे आल्यानंतर पक्षात उत्साहाचे वातावरण असून विरोधकांमध्येही हालचाल सुरू झाली आहे. स्थानिक राजकीय समीक्षकांच्या मते, अभिलाषा रोकडे या नव्या विचारांची, अभ्यासू आणि जनतेशी थेट जोड असलेली नेत्री आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास स्पर्धा एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 नव्या पिढीचा आत्मविश्वास, जनतेचा विकास :- अभिलाषा भिला रोकडे यांची उमेदवारी ही महिलांच्या नेतृत्वाचा आणि नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. त्यांचा संवाद आणि भाष्य हे पारंपरिक राजकारणापेक्षा अधिक ‘जनतेच्या भावनेतून उमटलेले’ आहे. त्यांच्या उमेदवारीने नगरदेवळा पंचायत समिती गणात स्पर्धेचा नवा रंग भरला आहे.





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home