भिसेगावकरांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा पुढाकार
नवीन पाणी योजनेतून पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याची निवेदनाद्वारे केली मागणी
खालापुर कर्जत /सुधीर देशमुख :- मागील काही वर्षात कर्जतची तिसऱ्या मुंबईकडे वाटचाल सुरू आहे. नव्याने सुरू होणार असलेले कर्जत पनवेल रेल्वे मार्ग तसेच नवी मुंबई विमानतळ यामुळे कर्जत शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिक यामुळे येथील गृह संकुलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी नवीन जल योजनेसाठी तब्बल 54 कोटी रुपये निधी मंजूर करून आणून या योजनेचे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव येथे दोन लाख लिटर शब्दाची पाण्याची टाकी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र या परिसरातील नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता ती टाकीची क्षमता अपुरी पडणार असल्याने या जागेवर पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारावी अशी मागणी शिंदे शिवसेना युवा गटाच्या वतीने निवेदनाद्वारे कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.
कर्जत शहरातील भिसेगाव येथील वॉटर स्कीम मधून वाढीव पाण्याची टाकी बांधण्यासाठी सोमवारी शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे दिले.
कर्जत शहरांमध्ये वाढती लोकसंख्या तसेच झपाट्याने होणारे विकास कामे. कर्जत - पनवेल रेल्वे तसेच सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने शहराची झपाट्याने वाढ होत आहे. या वाढीव लोकसंख्येला लक्षात घेऊन तसेच पाण्याचा उद्भवत असलेला प्रश्न पाहता आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरांमध्ये वॉटर स्कीम नव्याने आणली आहे. या वॉटर स्कीम मुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे. परंतु ज्या प्रकारे भिसेगाव येथे सर्व्हे केला व त्यानुसार नगरपरिषद ने दोन लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्याचे काम चालू केले आहे. त्याप्रमाणे भिसेगाव परिसरामध्ये राधे गॅलेक्सी , आर्यन टॉवर तसेच अनेक मोठमोठे टोलेजंग इमारती सारखे संकुल प्रकल्प असल्याने व अनेक प्रकल्प या परिसरामध्ये भविष्यात होणार असल्यामुळे या भागामध्ये या वॉटर स्कीम ने येणारे पाण्याचा भविष्यात या परिसरातील नागरिकांना तुटवडा भासणार असल्यामुळे युवासेना शहर प्रमुख अमोघ कुळकर्णी यांनी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना वाढीव पाण्याची टाकी बांधण्याचे निवेदन दिले आहे.
तसेच भिसेगाव परिसरामधील सटवी आई या भागामध्ये तीन विद्युत पोलची मागणी केली आहे. तसेच कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी व अन्य परिसरातील समस्यांविषयी मुख्याधिकारी चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकारी चव्हाण यांनी भिसेगावकरांचे समस्या समजून घेऊन लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी निवेदन देताना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे ,युवासेना शहर प्रमुख पश्चिम अमोघ कुळकर्णी, शहर युवा प्रमुख पूर्व सचिन भोईर , शहर उप प्रमुख मोहन भोईर, दिनेश कडू, प्रसाद डेरवणकर, सुदेश देवघरे , अनंता जूनघरे, विकास लाड ,सचिन खंडागळे, संजय जाधव पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home