बाबासाहेबांच्या आदर्शांवर चालणारे समाजच खऱ्या अर्थाने प्रगत — एम. डी. कांबळे
धाटाव खैरवाडी येथे वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप; विचारमंथनातून समाजजागृती
कर्जत /सुधीर देशमुख :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी धाटाव एमआयडीसी परिसरातील खैरवाडी येथे वर्षावास प्रवचन मालिका समारोप उत्साहात पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोहा तालुका अध्यक्ष मारुती लोखंडे यांनी भूषविले, तर कोकण विभागीय अध्यक्ष एम. डी. कांबळे यांनी प्रेरणादायी प्रवचन दिले. त्यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळे समाजाच्या प्रगतीचा पाया कसा घातला, याचे विवेचन केले. तसेच तथागत बुद्धांच्या ‘विषादवाद’ आणि ‘विमोचक’ सिद्धांतांची सोप्या भाषेत मांडणी केली. त्यांच्या ओजस्वी विचारांनी उपस्थित धम्मबांधव भारावून गेलेले पहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान प्रवचनकार एम. डी. कांबळे यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा सल्लागार यशवंत शिंदे, सूर्यकांत कांबळे, सुप्रिया कांबळे, मिराताई सुरळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून झाली, तर समारोप सरणतय घेऊन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व धम्मबांधवांना इंगळे परिवाराकडून भोजनदान देण्यात आले. या वेळी सुरेश वाटवे, अमोल वाटवे, मनिषा इंगळे, सुभाष इंगळे, मिलिंद गमरे, नम्रता शिंदे, अक्षदा वाटवे, अश्विनी वाटवे, ज्योती वाटवे, मनोज शिंदे, मनिषा लोखंडे, प्रमिला रसाळ, सिंधुताई, वर्षा इंगळे, रेश्मा इंगळे, शिल्पा इंगळे, विश्वास इंगळे, विशाल सुरळकर, संजना सुरळकर, शीतल इंगळे, अशीष गाजीकर, वाघमोडे, मनिषा तायडे, कल्पना खंडारे, वाघमारे सर, तुळशीराम शिर्के, प्रकाश शिर्के, देवराम इंगळे, नारायण गायकवाड लहान बाल, बालिका आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home