Sunday, October 12, 2025

रायगड मी मराठी प्रतिष्ठान ३१ डिसेंबरला पालक कृतज्ञता दिन साजरा करणार

 



देशात नवा इतिहास घडणार

पालक कृतज्ञता दिनाच्या बिल्ल्याचे अनावरण

 खालापुर कर्जत/ सुधीर देशमुख :- विदेशी वस्तू विरोधात देशात जनजागृती चालू असतानाच आपली संस्कृती विरुद्ध विदेशी विकृती हा देशातील नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि) तर्फे आपल्या भारत देशाची संस्कृती जपण्यासाठी समाजातील ३१ डिसेंबर विदेशी विकृतीचा (थर्टी फर्स्ट) हाणून पाडून हया दिवशी प्रतिष्ठान भारतीय संस्कृतीतील पालक कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यासाठी आपल्या पालकांचे उपकाराची कष्टाची जाण स्मरण करण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानून धन्यवाद म्हणण्यासाठी त्यातून समाजाला चांगला बोधप्रद विचार मिळण्यासाठी ३१ डिसेंबर पालक कृतज्ञता दिन(parents thanksgiving day )म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान समाज कल्याणासाठी विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करीत असते. 

प्रतिष्ठानचा ७ वा वर्धापन दिन नुकताच पटेल हायस्कूल गोरेगाव मुंबई येथे मोठ्या उत्साहात विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ह्यावेळी प्रतिष्ठानतर्फे देशातील पहिल्या ३१ डिसेंबर पालक कृतज्ञता दिनाच्या बिल्ल्याचे अनावरण करण्यात आले. सर्वांना ही संकल्पना आवडली असून सर्वांनी कौतुक केले. व हया दिनाचा प्रसार आपापल्या परीने जनजागृती करण्याचे मान्य केले. प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश लाड हे ह्यासाठी पुढाकार घेणार आहेत. विदेशात अनेक कुटुंबीय त्यांच्या संस्कृतीमुळे दुरावत चालली आहेत त्यासाठी त्यांना फॅमिली फर्स्ट हा उपक्रम सुरू करावा लागत आहे. भारतात हे लोण पसरत आहे. त्याला रायगड मी मराठी प्रतिष्ठान ( रजि) च्या ३१ डिसेंबर पालक कृतज्ञता दिनाने भारतीय संस्कृतीत जगावेगळा पिढ्यानपिढ्या चांगला आदर्श बदल घडेल आणि समाजाला त्याचा चांगला फायदा होईल यात शंका नाही.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home