“Lifetime Achievement in Journalism Award ने पत्रकार फिरोज पिंजारी यांचा सन्मान......
पत्रकारितेतील 17 वर्षांच्या निःस्वार्थ, निर्भीड आणि समाजाभिमुख कार्याची दखल
12 ऑक्टोबर रोजी पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न....
पुणे / मानसी कांबळे :- पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने आणि निडरपणे काम करीत सामाजिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्याचा शोध जपणाऱ्या पत्रकार फिरोज बशीर पिंजारी यांना प्रतिष्ठेचा “Lifetime Achievement in Journalism Award 2025” मिळाला आहे. हा सन्मान KPM Media and Tech LLP तर्फे आयोजित भारत उद्योगरत्न पुरस्कार 2025 सोहळ्यात 12 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकारितेचा प्रवास - शब्दांतून समाजाशी नातं :- पत्रकार फिरोज पिंजारी हे दै. कोकण प्रदेश न्यूज व दै. कोकण प्रजाचे मुख्य संपादक आहेत. केपी न्यूज ग्रुपचे प्रमुख तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, माय कोकण न्युज 24 चे उपसंपादक, तसेच डी.के. फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक आहेत. त्यांनी पत्रकारितेचा उपयोग समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, शेतकरी, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांना आवाज देण्यासाठी केला आहे. त्यांच्या बातम्या, संपादकीय आणि सामाजिक चळवळींनी प्रशासनाला नेहमीच जबाबदार ठेवले.
शिक्षणातून पत्रकारितेचा मजबूत पाया :- फिरोज पिंजारी यांनी Mass Communication and Journalism मध्ये एम.ए. (पदव्युत्तर पदवी) आणि बी.ए. राज्यशास्त्रमध्ये शिक्षण घेतले आहे. ज्ञान, प्रामाणिकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम त्यांच्या कार्यशैलीत दिसतो. त्यांनी पत्रकारितेला केवळ व्यावसायिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून स्विकारले आहे. “पत्रकार म्हणजे जनतेचा आरसा, आणि समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज” या विचाराने त्यांनी आपल्या लेखनातून व कार्यातून समाजात परिवर्तन घडवले आहे.
पुरस्काराची गौरवशाली पार्श्वभूमी :- हा पुरस्कार त्यांना ‘Lifetime Achievement in Journalism’ या श्रेणीत देण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला आहे. KPM Media & Tech LLP ने त्यांच्या 17 वर्षांच्या पत्रकारितेतील योगदानाची, त्यांच्या निर्भीड वृत्तीची आणि जनहितासाठीच्या सततच्या लढ्याची प्रशंसा केली आहे.
त्यांचा हा गौरव त्यांच्या दीर्घकाळच्या समर्पित, निष्पक्ष आणि संवेदनशील पत्रकारितेची दखल मानला जात आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी उचललेले प्रश्न, मानवाधिकाराच्या उल्लंघनावर त्यांनी दाखवलेली धैर्यशील भूमिका, आणि सत्याशी असलेली त्यांची बांधिलकी, हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.
KPM Media चा गौरव संदेश :- फिरोज पिंजारी हे महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहून समाजात परिवर्तनाची दिशा दिली. त्यांचा हा पुरस्कार हे त्यांच्या अथक परिश्रमाचं प्रतीक आहे.
पत्रकारितेतील प्रामाणिकतेचा दीप कायम तेजोमय राहो :- फिरोज पिंजारी यांच्या लेखणीने समाजातील सत्य मांडण्याचं, जनतेला न्याय मिळवून देण्याचं आणि लोकशाही बळकट करण्याचं कार्य केलं आहे. त्यांचा हा सन्मान महाराष्ट्र पत्रकारितेसाठी अभिमानाची बाब आहे.
पत्रकारितेत सातत्य, निर्भीडपणा आणि प्रामाणिकता जपणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये फिरोज पिंजारी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या लेखणीने समाजाला विचार करायला भाग पाडले आणि शासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे , हा पुरस्कार त्या योगदानाची योग्य दखल आहे. तरी न्युज जर्नलिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी, पत्रकार, युवा पिढी, नागरिकां कडून सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home